वरईच्या तांदळाचे अनारसे - पाककृती

वरईच्या तांदळाचे अनारसे, पाककला - [Varaichya Tandalache Anarase, Recipe] सणासुदीला तसेच उपवासाला बदल म्हणुन खाता येईल असे खुसखुशीत ‘वरईच्या तांदळाचे अनारसे’ सर्वांना आवडतील.
वरईच्या तांदळाचे अनारसे - पाककला | Varaichya Tandalache Anarase - Recipe

सणासुदीला तसेच उपवासाला चालणारे वरईच्या तांदळाचे अनारसे

‘वरईच्या तांदळाचे अनारसे’साठीचे जिन्नस

  • वरईचे तांदुळ
  • गूळ
  • तळण्यासाठी तूप
  • खसखस

‘वरईच्या तांदळाचे अनारसे’ची पाककृती

  • वऱ्याचे तांदूळ ३ दिवस भिजत घाला. नंतर उपसून, अर्धवट वाळवून कुटून घ्या.
  • नंतर त्यात पिठाच्या निम्मा गूळ घाला.
  • १ वाटी पिठाला २ चमचे (सपाट) गूळ घाला व पीठ तयार करा.
  • दुसऱ्या दिवशी खसखशीवर थापून अनारसे करावे व तुपात तळावे.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.