चण्याचे सॅलड - पाककृती

चण्याचे सॅलड, पाककला - [Chanyache Salad, Recipe] रूचीपालट म्हणून काबुली चणे घालुन केलेले हे काहीसे वेगळ्या प्रकारचे ‘चण्याचे सॅलेड’ अत्यंत रूचकर आणि चटपटीत लागते, अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल.
चण्याचे सॅलड - पाककला | Chanyache Salad - Recipe

थंडावा देणारे चण्याचे सॅलड

‘चण्याचे सॅलड’साठी लागणारा जिन्नस

 • २ वाट्या शिजवलेले चणे (काबुली)
 • अर्धी वाटी कोथिंबीर
 • अर्धी वाटी टोमॅटो
 • अर्धी वाटी काकडी (कोचवलेली)
 • २ मोठे चमचे व्हिनेगर
 • २ लिंबाचा रस
 • २ चमचे तेल
 • २ - ३ लसूण पाकळ्या
 • पाव चमचा मोहरीची ताजी पुड
 • चवीनुसार मीठ व मिरपूड

‘चण्याचे सॅलड’ची पाककृती

 • २ वाट्या काबुली चणे आदल्या रात्री भिजत घालावेत.
 • दुसऱ्या दिवशी सकाळी निथळून पाणी व मीठ घालून शिजवावेत.
 • कोथिंबीर, टोमॅटो, काकडी व लसूण बारीक चिरावी (लसूण नसला तरी चालेल).
 • एका मोठ्या भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत व अलगद हलवावे.
 • आवडीनुसार हिरवी मिरची बारीक चिरून वापरावी.

परदेशात शिजलेले काबुली चणे डबाबंद मिळतात. हे डबे वापरण्यास सोयीस्कर आहेत. आपल्याकडे छोले हा एकच प्रकार चण्याचा केला जातो. बदल म्हणून हे सॅलड करून पहा.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.