केक पुडिंग - पाककृती
केक पुडिंग, पाककला - [Cake Pudding, Recipe] केक, दूध, टुटी फ्रुटी, सुका मेवा असे पदार्थ एकत्र करुन केलेला गोड पदार्थ म्हणजे ‘केक पुडिंग’ हे डेझर्ड म्हणुन खाता येईल.
लहान मुलांना प्रिय असलेले केक पुडिंग
‘केक पुडिंग’साठी लागणारा जिन्नस
- ६ वाटी साधा केक
- २ वाट्या दूध
- चवीनुसार साखर
- २ चमचे कस्टर्ड पावडर
‘केक पुडिंग’ सजवण्यासाठी
- टुटी फ्रुटी
- सुका मेवा
- चेरी
‘केक पुडिंग’ची पाककृती
- एका चपट्या डब्यात केक कुस्करुन घ्या.
- दुधात कस्टर्ड पावडर आणि साखर घाला. हे तयार मिश्रण केकमध्ये मिक्स करा.
- त्यावरती टुटी फ्रुटी, सुका मेवा, चेरीने सजवा.
- नंतर डब्याला घट्ट झाकण लावून डीप फ्रिजमध्ये दोन ते अडीच तास सेट करण्यास ठेवा.
- बाहेर काढून सुरीने वड्या पाडून थंड थंड केक पुडिंग सर्व्ह करा.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.