स्पेशल चिकन करी - पाककृती

स्पेशल चिकन करी, पाककला - [Special Chicken Curry, Recipe] वेगळ्या पद्धतीची, चमचमीत ‘स्पेशल चिकन करी’ तुमच्या जेवणाचा स्वाद वाढवेल.
स्पेशल चिकन करी - पाककला | Special Chicken Curry - Recipe

वेगळ्या पद्धतीची, चमचमीत स्पेशल चिकन करी

‘स्पेशल चिकन करी’साठी लागणारा जिन्नस

 • ६२५ ग्रॅम चिकन पीस
 • ४ मोठे चमचे तेल
 • ६ कडीपत्त्याची पाने
 • १/४ चमचा कलौजी
 • १/४ चमचा सरसो
 • ८ कापलेले टोमॅटो
 • १ चमचा वाटलेले धणे
 • १ हिरवी मिरची
 • १ चमचा मीठ
 • १ चमचा वाटलेले जीरे
 • १ चमचा लसणाची पेस्ट
 • ३/४ कप पाणी
 • १ मोठा चमचा भाजलेले तीळ
 • २ चमचे कोथंबीर

‘स्पेशल चिकन करी’ची पाककृती

 • एका कढईत तेल गरम करून पहिले कडीपत्ते फ्राय करावे.
 • नंतर कलौजी व सरसो भाजावे.
 • गॅस कमी करून टोमॅटो टाकावे व २ मिनीट फ्राय करून वाटलेले धणे, हिरवी मिरची, मीठ, वाटलेले जीरे व लसूण टाकावे.
 • चिकन पीस टाकावे आणि हलवत रस्सा घट्ट होईपर्यंत व चिकन गळेपर्यंत शिजवावे.
 • शिजल्यावर वरून तीळ व कोथंबीर टाकावी.
 • तयार आहे स्पेशल चिकन करी.
 • सर्विंग डिश मध्ये साध्या भाताबरोबर गरम गरम वाढावी.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.