कैरीचे पन्हे प्रकार २ - पाककृती

कैरीचे पन्हे प्रकार २, पाककला - [Kairiche Panhe Type 2, Recipe] उन्हाळ्यात थंडाव्यासाठी तसेच उष्णतेने मंदावलेली पचनशक्ती पुन्हा सुरळीत करण्यासाठी हे सुगंधी कैरीचे पन्हे उपयोगी ठरते.
कैरीचे पन्हे प्रकार २ - पाककला | Kairiche Panhe Type 2 - Recipe

उन्हामुळे मंदावलेली पचनशक्ती सुधारणारे सुगंधी कैरीचे पन्हे

‘कैरीचे पन्हे प्रकार २’साठी लागणारा जिन्नस

  • ५०० ग्रॅम कैऱ्या
  • मीठ
  • साखर
  • चवीप्रमाणे वेलची पूड

‘कैरीचे पन्हे प्रकार २’ची पाककृती

  • कैरीचे साल काढून ती किसून घ्यावी.
  • थंड पाण्यात हा कीस टाकून तो कुस्करून घ्यावा.
  • त्यामध्ये अंदाजाने मीठ व साखर घालावी.
  • तयार पन्हे गाळण्यातून गाळून घ्यावे व त्यामध्ये वेलची पूड टाकावी.
  • हे पन्हे आयत्यावेळी करता येते.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.