चिकन सूप - पाककृती

चिकन सूप, पाककला - [Chicken Soup, Recipe] थंडीच्या दिवसात सर्दीसाठी तसेच आजारी व्यक्तिंना आणि लहान मुलांना उपयुक्त असे ‘चिकन सूप’ घरी बनवून द्या.
चिकन सूप - पाककला | Chicken Soup - Recipe

लहान मुलांच्या आरोग्यास लाभदायक असे चिकन सूप

‘चिकन सूप’साठी लागणारा जिन्नस

  • पाव किलो चिकन
  • १ लहान कांदा
  • १ दालचिनीचा तुकडा
  • ४ - ५ काळी मिरी
  • चवीनुसार मीठ

चिकन सूपची पाककृती

  • चिकन स्वच्छ धूवून तुकडे करून घ्यावेत.
  • ४ कप पाण्यात एका लहान कांद्याचे तुकडे, चिकनचे तुकडे, लहानसा दालचिनीचा तुकडा, ४ - ५ काळी मिरी टाकावी.
  • चिकन चांगले शिजू द्यावे.
  • चिकन शिजल्यावर गाळून घ्यावे. तयार आहे चिकन सूप. आता त्यात चवीपुरते मीठ टाकावे.
  • थंड झाल्यावर वरती चरबी येईल ती काढून टाकावी व नंतर पुन्हा गरम करुन सर्व्ह करावे.
आजारी व्यक्तिंना किंवा लहान मुलांना देण्यास चिकन सूप अतिशय फायदेशीर आहे.

थंडीच्या दिवसात सर्दीला चिकन सूप अतिशय चांगले.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.