मजेदार कटलेट्स - पाककृती

मजेदार कटलेट्स, पाककला - [Majedar Cutlets, Recipe] तयार भात, उसळी तसेच ब्रेड व भाज्यांनी उपयुक्त असे ‘मजेदार कटलेट्स’ न्याहारी किंवा मधल्या वेळेत मुलांना खायला देता येईल.
मजेदार कटलेट्स- पाककला | Majedar Cutlets - Recipe

खास लहान मुलांसाठी सर्व भाज्यांनी युक्त असलेले चटपटीत असे मजेदार कटलेट्स

‘मजेदार कटलेट्स’साठी लागणारा जिन्नस
 • १ वाटी तयार भात
 • १ वाटी सुक्या वाटाण्यांची उसळ
 • ४ ब्रेडचे स्लाईस
 • १ वाटी वाफवलेला कोबी
 • २ मोठे कांदे
 • १ इंच आले
 • ४/५ हिरव्या मिरच्या
 • २-३ डाव चण्याच्या डाळीचे पीठ
 • थोडा रवा
 • मीठ

‘मजेदार कटलेट्स’ची पाककृती
 • कांदा बारीक चिरुन घ्यावा व थोड्या तेलावर परतवून घ्यावा. आले व मिरच्याही बारीक चिराव्यात.
 • नंतर रवा सोडून इतर सर्व वस्तू एकत्र कराव्यात व त्याचे लिंबाएवढे गोळे तयार करावेत.
 • एका छोट्या डिशमध्ये थोडासा रवा टाकून वरील तयार केलेल्या पिठाचा एक गोळा त्यात ठेवून बोटांनी जरा जरा चपटा करावा. वरही थोडा रवा घालावा व कागदावर उपडे करावे म्हणजे छान गोल आकाराचे कटलेट तयार होईल.
 • त्याच्या कडाही रव्यात घोळाव्यात. ३-४ कटलेट तयार झाली की तव्यावर १ डाव तेल टाकून तांबूस रंगावर तळून घ्यावीत.
 • चिंचेच्या चटाणीसोबत खावीत. फार छान लागतात.
वाट्याण्याची उसळ नसल्यास इतर कुठलीही उसळ चालेल.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.