ज्वारीचे धपाटे - पाककृती

ज्वारीचे धपाटे, पाककला - [Jwariche Dhapate, Recipe] ज्वारीच्या पिठात कांदा टाकून भाजलेली गरमागरम, खुशखुशीत, चटपटीत असल्यामुळे ‘ज्वारीचे धपाटे’ न्याहारी किंवा मधल्या वेळेत खाता येतील आणि टिकाऊ असल्यामुळे प्रवासालाही नेता येतात.
ज्वारीचे धपाटे - पाककला | Jwariche Dhapate - Recipe

खुशखुशीत, चटपटीत आणि टिकाऊ ज्वारीचे धपाटे

‘ज्वारीचे धपाटे’साठी लागणारा जिन्नस

 • ३ वाट्या ज्वारी पीठ
 • १ वाटी किसलेला कांदा
 • १ टी स्पून लसूण
 • १ टे. स्पू. प्रत्येकी दाणेकूट व तीळकूट
 • १/२ वाटी कोथिंबीर
 • तिखट
 • मीठ
 • तेल

‘ज्वारीचे धपाटे’ची पाककृती

 • ज्वारीचे पीठ चाळून घ्या.
 • ज्वारीच्या पीठात किसलेला कांदा, लसूण, दाणेकूट व तीळकूट, कोथिंबीर, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र मळावे.
 • तयार पीठाचे गोळे पातळ भाकरीप्रमाणे थापावे.
 • गॅसवर तवा गरम करत ठेवावा.
 • तवा तापल्यावर ही धपाटी तेल टाकून लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजावे. तयार आहे गरम गरम धपाटी..! दही किंवा चटणी सोबत खावीत.

ही धपाटी ७-८ दिवस टिकतात आणि ही प्रवासासाठीही अधिक उपयुक्त.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.