राजस्थानी एक गोड पदार्थ ‘मूग डाळीचा हलवा’
‘मूग डाळीचा हलवा’साठी लागणारा जिन्नस
- २ वाट्या मूग डाळ
- २ वाट्या साखर
- ३ वाट्या दूध
- १ १/२ वाटी तूप
- १५० ग्रॅम खवा
- ७-८ वेलदोड्याची पूड
- २५ ग्रॅम बेदाणा
- थोडा पिवळा रंग (ऐच्छिक)
‘मूग डाळीचा हलवा’ची पाककृती
- मूगाची डाळ ३ ते ४ तास भिजत घालावी.
- चांगली भिजल्यावर त्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये रवाळ वाटावी.
- गॅसवर कढईत तूप तापत ठेवावे.
- वाटलेल्या डाळीत २ वाट्या दूध घालून कालवावे व तूप तापल्यावर त्यात हे डाळीचे मिश्रण घालून चांगले मोकळे होईपर्यंत परतावे.
- चांगले परतल्यावर त्यात रंग घालावा. नंतर साखर घालून चांगले परतत रहावे.
- मिश्रण जरा घट्ट झाले कि गॅस बंद करून उतरावे.
- आता त्यात बेदाणा व वेलचीपूड घालावी. आवडत असल्यास काजू, पिस्त्याचे काप घालू शकता.
- खव्यामध्ये १ वाटी दूध घालून सारखा करावा व खवा गॅसवर ठेवून जरा आटवून घ्यावा.
- आयत्या वेळी मुगाच्या डाळीच्या हलव्यात खवा घालून सर्व्ह करावा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ