मशरूम पुलाव - पाककृती

मशरूम पुलाव, पाककला - [Mushroom Pulao, Recipe] जीवनसत्व ‘ड’ असलेले मशरुम, भाज्या आणि पनीर युक्त ‘मशरूम पुलाव’ घरातील काही मंगल प्रसंगी करण्यासाठी तसेच नेहमीच्या पुलावापेक्षा चव बदल म्हणून अत्यंत उत्तम पर्याय आहे.
मशरूम पुलाव- पाककला | Mushroom Pulao - Recipe

मशरुम, भाज्या आणि पनीर युक्त ‘मशरूम पुलाव’

‘मशरूम पुलाव’साठी लागणारा जिन्नस

 • २ वाटी पुलाव तांदूळ
 • १ डबा मशरूम
 • २५० ग्रॅम पनीर
 • ३ कांदे
 • २ ढोबळी मिरची
 • २ गाजर
 • १ लहान चमचा मीठ
 • १/२ लहान चमचा गरम मसाला
 • ५ चमचे तूप

‘मशरूम पुलाव’ची पाककृती

 • तांदूळ धुऊन स्वच्छ करून तासभर भिजवा.
 • मशरूम धुऊन बारीक व लांब चिरुन घ्या. पनीर चौकोनी चिरुन तळून घ्या.
 • कांदा, ढोबळी मिरची, गाजर बारीक व लांब चिरुन घ्या.
 • एका पातेल्यात तूप गरम करा. कांदा टाकून परता.
 • कांदा गुलाबीसर झाल्यावर गरम मसाला, मीठ व मशरूम टाकून शिजवा.
 • आता ढोबळी मिरची, गाजर व पनीर टाका.
 • तांदूळ टाकून ४ वाटी पाणी टाका व गॅस कमी करुन झाकून शिजवा.
 • शिजल्यावर गरम-गरम वाढा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.