भरलेली शिमला मिरची - पाककृती

भरलेली शिमला मिरची, पाककला - [Bharaleli Shimala Mirchi, Recipe] भरलेल्या शिमला मिरचीच्या सुक्या भाजीची पाककृती.
भरलेली शिमला मिरची - पाककृती | Bharaleli Shimala Mirchi - Recipe

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी भरलेल्या शिमला मिरचीची सुकी भाजी हा एक उत्तम पर्याय

उग्र वासामुळे बर्‍याचदा शिमला मिरचीचे पदार्थ आपणांस नकोसे वाटतात, मात्र भरलेली शिमला मिरची मध्ये बटाटे, टोमॅटो आणि तुप यामुळे एक खमंग स्वाद आपल्याला मिळतो आणि नावडती शिमला मिरची आवडती होऊन जाते, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात हा पदार्थ एकवेळ नक्की करून पाहावा.

‘भरलेली शिमला मिरच’साठी लागणारा जिन्नस

 • शिमला मिरची
 • ३ उकडलेले बटाटे
 • अर्धा कप वाटाणे
 • एक टोमॅटो
 • सुके मसाले
 • तूप इच्छेनुसार
 • कांदा

‘भरलेली शिमला मिरची’ची पाककृती

 • शिमला मिरची पोकळ करून पाण्यात उकळवून घ्यावी. उकळल्यानंतर शिमला मिरची उलटी ठेवावी म्हणजे पाणी निघून जाईल.
 • आता एका कढईत एक पळी तूप टाकून जिरे भाजावे. दिड चमचा मीठ, २ चमचे धणे, एक चमचा हळद, १/२ चमचा तिखट, २ चमचे खटाई टाकुन भाजावे.
 • उकळलेले बटाटे व उकळलेले वाटाणे टाकुन हलवावे. टोमॅटो टाकावे व चांगल्या तर्‍हेने फेटावे मिश्रण बिलकुल सुके झाले पाहिजे.
 • आता शिमला मिरचीत हे मिश्रण चांगल्या तर्‍हेने दाबून दाबून भरावे.
 • आता एक कढईत तूपात शिमला मिरची तळावी. पाहिजे तर ओव्हन मध्ये बेक करावी.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.