पौष्टिक व पोटभर न्याहारीसाठी भाजणीचे थालीपीठ
भाजणीचे थालीपीठ - न्याहारी म्हणून चटपटीत, कुरकुरीत पौष्टिक भाजणीचे थालीपीठ खाता येतील.
भाजणीचे थालीपीठ करण्यासाठी लागणारा जिन्नस
- १ भांडे भाजणी
- १ लहान कांदा
- अर्धा चमचा मीठ
- तिखट
- पाव चमचा हळद
- कोथिंबीर
- १ पळी तेल
- धणे - जीरे पावडर
भाजणीचे थालीपीठ करण्याची पाककृती
- भाजणीमध्ये कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- लाल तिखट, हळद, मीठ, तेल, धणे - जीरे पावडर घालून मऊसर भिजवावी.
- त्याचे छोटे छोटे पुरीला करतो तेवढे गोळे करुन घ्यावे.
- प्लॅस्टिक पिशवीवर १ - २ थेंब तेल टाकून हा गोळा त्याच्यावर थापावा.
- तव्याला तापवून त्यावर तेल सोडून थापलेले थालिपीठ टाकावे.
- वाटल्यास बाजूने थोडे तेल सोडावे.
- मंद गॅसवर दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजावे.
- गरमागरम थालिपीठ दही, चटणी किंवा सॉसबरोबर खाण्यास द्यावे.
टीप: कांदा घालायचा नसल्यास हिंग घालावा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला