भरली टोमॅटो - पाककृती

भरली टोमॅटो, पाककला - [Bharli Tomato, Recipe] भरली भेंडी, भरली वांगी किंवा भरलेली शिमला मिरची आपल्या परिचयाचे आणि आवडीचे पदार्थ आहेत त्याच प्रमाणे भरल्या मसाल्याच्या भाजीच्या प्रकारातील भरली टोमॅटो आपल्याला नक्की आवडेल. रूचकर, जेवणाची चव वाढवणारा आणि भाकरी, चपाती किंवा गुजराती फुलक्या सोबत रोजच्या जेवणातील रूची पालट म्हणून आपण हा पदार्थ नक्की करून पाहावा.
भरली टोमॅटो - पाककला | Bharli Tomato - Recipe

भरल्या मसाल्याची चटपटीत, मसालेदार भरली टोमॅटो

‘भरली टोमॅटो’साठी लागणारा जिन्नस

 • १/२ कप दही
 • ५ टोमॅटो
 • ५० ग्रॅम वाटाणे
 • २ मोठे चमचे टोस्टचा चुरा
 • १ मोठा चमचा लोणी
 • २ उकडलेले बटाटे
 • कापलेला कांदा
 • मीठ
 • मिरची
 • धणे
 • हळद
 • हिरवी मिरची
 • कोथिंबीर
 • जीरे
 • गरम मसाला

‘भरली टोमॅटो’ची पाककृती

 • बटाट्यामध्ये पनीर, हिरवी मिरची, कोथिंबीर, उकडलेले वाटाणे, टोस्ट चूरा, लोणी, मीठ आणि मिरची चांगल्या रीतीने एकत्र करावे व टोमॅटोच्या आतमध्ये भरावे.
 • कढईत तेल टाकून जीरे, कापलेली मिरची, कांदा टाकून लाल करावे.
 • त्यानंतर यात टोमॅटो भरण्याआधी टोमॅटोच्या आतील काढलेला भाग एकत्र करावा व दही टाकून भाजावा.
 • आता भरलेले टोमॅटो यात सोडून पाणी टाकून झाकावे.
 • गरम झाल्यावर कोथिंबीर, क्रिम, गरम मसाला टाकावा.


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.