सणासुदीचा गोड पदार्थ किंवा गणपतीचा प्रसाद ‘खव्याचे मोदक’
‘खव्याचे मोदक’साठी लागणारा जिन्नस
- २०० ग्रॅम खवा
- १०० ग्रॅम पिठीसाखर
- २ चमचे गुलाबपाणी
- ४/५ चमचे दूध
- दोन कांड्या केशर
‘खव्याचे मोदक’ची पाककृती
- एका भांड्यात खवा थोडा फेटून घ्या. केशर दुधात कालवून ठेवा.
- खवा कोरडा झालेला दिसला की कोरड्या पाट्यावर (किंवा मिक्सरमध्ये) चांगला वाटा. त्यावर थोडे केशर दूध आणि गुलाबपाणी टाका.
- मंद आचेवर कढई ठेवा. त्यात खवा घालून परता.
- खवा घट्ट होऊ लागल्यावर त्यात थोडी साखर बाजूला काढून बाकी साखर टाका. मिसळा. थोडे घट्ट झाल्यावर उतरवा.
- हातावर थोडी थोडी साखर घेऊन खव्याच्या गोळ्यातून थोडे थोडे तयार मिश्रण घेऊन त्याचे मोदक वळा/तयार करा. खा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ