आलू टिक्की - पाककृती

आलू टिक्की, पाककला - [Aloo Tikki, Recipe] लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडीची मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटीत आलु टिक्की.
आलू टिक्की - पाककला | Aloo Tikki - Recipe

मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटीत ‘आलु टिक्की’

‘आलू टिक्की’साठी लागणारा जिन्नस

 • ४ - ५ बटाटे
 • ३ स्लाईस ब्रेड
 • २ हिरव्या मिरच्या
 • १ टी. स्पून जीरे पावडर
 • चवीनुसार मीठ
 • १ लिंबू
 • मुठभर कोथिंबीर
 • ब्रेड क्रम्ब्स
 • तळण्यासाठी तेल

‘आलू टिक्की’ची पाककृती

 • बटाटे धुवून मऊसर शिजवून घ्या. त्याची सालं काढून मॅश करा.
 • ब्रेडचे स्लाईस पाण्यात बुडवून घ्या व हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाका.
 • हिरवी मिरची बारीक वाटून घ्या.
 • बटाटे, ब्रेड, मीठ, जीरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू पिळून सर्व मिक्स करा.
 • त्याचे गोळे बनवा व हाताने दाबून सपाट करा.
 • ब्रेड क्रम्ब्स मध्ये घोळवून तेलात तळून घ्या.
आलू टिक्की केचअप किंवा तिखट पुदीना चटाणीबरोबर सर्व्ह करा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.