सोपा चिकन पुलाव - पाककृती

सोपा चिकन पुलाव, पाककला - [Easy Chicken Pulao, Recipe] भुकेच्या वेळी झटपट करता येणारा मांसाहारी भाताचा पदार्थ म्हणजे सोपा चिकन पुलाव, दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात हा पदार्थ केला जाऊ शकतो.
सोपा चिकन पुलाव- पाककला | Easy Chicken Pulao - Recipe

झटपट करता येणारा मांसाहारी भाताचा पदार्थ ‘सोपा चिकन पुलाव’

‘सोपा चिकन पुलाव’साठी लागणारा जिन्नस

 • २ - ३ कप बासमती तांदूळ
 • २ टेबल स्पून दही
 • २५० ग्रॅम चिकन
 • २ टे. स्पून आलं - लसूण पेस्ट
 • गरजेनुसार तेल
 • १ टेबल स्पून गरम मसाला
 • १ टेबल स्पून पुलाव मसाला
 • २ बारीक चिरलेला कांदा
 • १ टोमॅटो
 • मूठभर कोथिंबीर
 • मूठभर पुदिना
 • लाल मिरची पावडर
 • हळद
 • १ टेबल स्पून तूप
 • १ हिरवी मिरची
 • १ मोठी वेलची
 • ३ कप पाणी
 • १ तेजपत्ता
 • बडिशेप

‘सोपा चिकन पुलाव’ची पाककृती

 • प्रथम तांदूळ धुवून घ्या आणि २० - २५ मिनीटे भिजत ठेवा. नंतर त्यातील सर्व पाणी काढून टाका.
 • अर्धी आलं - लसूण पेस्ट, दही, मीठ, हळद, गरम मसाला, बारीक चिरलेला पुदीना व कोथिंबीर, तेल घेवून चिकनला लावून मेरिनेट करायला ठेवून द्या.
 • कांदा लालसर, कुरकुरीत तळून घ्या व त्यातील अर्धा कांदा मेरिनेट मध्ये टाका.
 • प्रेशर कुकरमध्ये तेल व टोमॅटो परतून मऊसर करा व त्यात उरलेला तळलेला कांदा व बडिशेप टाका.
 • आता उरलेली आलं - लसूण पेस्ट टाकून परता. त्यामध्ये मेरिनेट केलेले चिकन टाकून परतून घ्या.
 • त्यानंतर पुलाव मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्या.
 • आता त्यामध्ये तांदूळ मिक्स करा व परतून घ्या.
 • ३ कप पाणी टाकून शिजवत ठेवा. शिजल्यावर थोडा वेळ निवायला ठेवा.
सॅलेड - रायते सोबत खाण्यास द्या.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.