Loading ...

शाही पुलाव - पाककृती

शाही पुलाव, पाककला - [Shahi Pulao, Recipe] मंगल प्रसंगी करण्यासाठी शाही पुलाव हा अत्यंत उत्तम पर्याय आहे.

शाही पुलाव - पाककला | Shahi Pulao - Recipe

मंगल प्रसंगी करण्यासाठी शाही पुलाव हा अत्यंत उत्तम पर्याय आहे


शाही पुलाव - (Shahi Pulao) उपयुक्त भाज्या, सुकामेवा आणि पनीरयुक्त असलेला हा ‘शाही पुलाव’ घरातील काही मंगल प्रसंगी करण्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे, लहानांपासून ते मोठ्यांनादेखील हा शाही पुलाव नक्की आवडेल.



शाही पुलावसाठी लागणारा जिन्नस
  • १५० ग्रॅम बदाम
  • २ वाटी तांदूळ
  • १०० ग्रॅम पनीर
  • १ वाटी मटार
  • १ गाजर
  • ३ कांदे
  • ४-६ कळी लसूण
  • १ तुकडा आले
  • २ हिरव्या मिरच्या
  • १/२ वाटी अननस चिरलेला
  • १ मोठा चमचा काजू
  • १ मोठा चमचा बेदाणे
  • १ चमचा जीरे
  • ४ लवंग
  • ३ हिरवी वेलची
  • २ तुकडे दालचिनी
  • ६ आख्खी काळी मिरी
  • मीठ चवीप्रमाणे
  • १/४ चमचा केशर
  • ६ चमचे तूप

शाही पुलावची पाककृती
  • तांदूळ धुऊन तासभर पाण्यात भिजवा. पातेल्यात चार कप पाणी टाकून गॅसवर ठेवा.
  • भिजवलेले तांदूळ पाणी काढून गॅसवरील पातेल्यात शिजवा. तांदूळ शिजल्यावर गॅस बंद करा.
  • पनीरचे चौकोनी तुकडे करा. गाजर सोलून चिरुन घ्या. मटारचे दाणे काढा. कांदा-लसूण व आले सोलून घ्या. कांदा बारीक चिरावा. आले-लसूण व हिरवी मिरची मिक्सरमधून काढा. केशर २ चमचे पाण्यात भिजवा.
  • एका कढईत तूप गरम करून काजू तळून घ्या. त्याच कढईत जिर्‍याची फोडणी देऊन कांदा परतून घ्या. नंतर लवंग, हिरवी वेलची, दालचिनी व काळी मिरी वाटून टाका.
  • आता आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट टाकून परता. पेस्ट चांगली परतल्यावर मटार, गाजर, पनीर, अननस, काजू, बेदाणे व चवीनुसार मीठ टाकून एकत्र करा.
  • दोन मिनीटे परतून शिजलेले तांदूळ व केशर टाकून नीट एकत्र करा, गॅस बंद करून गरमा-गरम वाढा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची