Loading ...

फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी - पाककृती

आपण बर्‍याचदा शिजलेल्या फ्लॉवरच्या वासामुळे फ्लॉवरची भाजी खाण्यास टाळाटाळ करतो मात्र ‘फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी’ मध्ये चीझ - फ्लॉवरचे कोफ्ते आणि सोबत करी एकूण भाजीला एक वेगळी चव देतात, कोफ्ते प्रकारातील भाज्या आवडत असल्यास हा प्रकार एकदा नक्की करून पहावा, लहान मुलांच्या अत्यंत आवडीचा हा भाजीचा प्रकार आहे.

फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी - पाककला | Flower Cheese Kofta Curry - Recipe

चमचमीत, मसालेदार आणि मुलांना आवडेल अशी फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी

‘फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी’साठी लागणारा जिन्नस

  • १/२ किलो फ्लॉवर
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • १/२ लिंबाचा रस
  • ६० ग्रॅम चीझ
  • ३ ब्रेडचे स्लाईस
  • १/४ चमचा गरम मसाला
  • थोडेसे वाटलेले आले
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ

ग्रेव्हीसाठी जिन्नस

  • २ मोठे कांदे
  • १ मोठा टोमॅटो

मसाला

  • ५-६ लसूण पाकळ्या
  • १ आल्याचा लहानसा तुकडा
  • १/२ चमचा धणे
  • १ चमचा जीरे
  • १/४ चमचा हळद
  • १ चमचा हळ्द
  • १ चमचा तिखट
  • मीठ

‘फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी’ची पाककृती

  • फ्लॉवर किसून घ्यावा व अगदी थोड्या पाण्यात शिजवून घ्यावा. सर्व पाणी आटले पाहिजे.
  • नंतर त्यात किसलेले चीझ बारीक चिरलेल्या मिरच्या, लिंबू रस, मीठ, आले, लसूण, गरम मसाला घालावा.
  • ब्रेडचा स्लाईस पाण्यात भिजवून हाताने दाबून त्यातले पाणी काढून टाकावे व तो फ्लॉवरच्या मिश्रणात घालावा.
  • मिश्रण चांगले मळून घ्यावे व त्याचे छोटे छोटे गोळे करुन तळून घ्यावेत.
  • ग्रेव्हीसाठी मसाला बारीक वाटून ठेवावा. थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा. त्यावर वाटलेला मसाला घालून परतावा.
  • नंतर त्यावर टोमॅटोचा रस घालावा. रस जरा दाटसर झाला की त्यात तळलेले कोफ्ते घालावे.
  • आयत्या वेळी वरुन थोडासा गरम मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची