रवा इडली - पाककृती

रवा इडली, पाककला - [Rava Idli, Recipe] रवा दह्यात भिजवून केलेली ‘रवा ईडली’ ही झटपट बनवता येणारी सोप्पी पाककृती आहे.
रवा इडली- पाककला | Rava Idli - Recipe

झटपट होणारी रवा इडली

‘रवा इडली’साठी लागणारा जिन्नस

 • १/२ किलो रवा
 • १ लहान चमचा मीठ
 • १/२ लहान चमचा मोहरी
 • १०-१२ कढीपत्त्याची पाने
 • ३०० ग्रॅम आंबट दही
 • १ लहान चमचा खाण्याचा सोडा
 • तेल

‘रवा इडली’ची पाककृती

 • एका कढईत तेल गरम करून त्याच्यात मोहरी व चिरून कढीपत्ता व रवा टाका.
 • थोडासा भाजून गॅस बंद करा.
 • गार झाल्यावर एका भांड्यात रवा दहीत भिजवा.
 • मीठ टाकून १ तास झाकून ठेवा. मिश्रण जास्त पातळ असू नये.
 • इडली पात्रांना तेल लावून ठेवा.
 • एका वाटीत तेल गरम करून त्यामध्ये १ लहान चमचा खाण्याचा सोडा टाका व गरम करा.
 • हे रव्याच्या मिश्रणात टाकून लवकर लवकर हलवा म्हणजे मिश्रण फुलून येईल.
 • आता हे मिश्रण तेल लावलेल्या इडली पात्रांमध्ये टाका.
 • इडली कुकरमध्ये १ ग्लास पाणी टाकुन उकळी घ्या.
 • इडली पात्र कुकरमध्ये ठेवा. झाकण लावून १५ मिनीटे गॅसवर ठेवा.
 • १५ मिनीटानंतर गॅस बंद करून एखादं मिनीट थांबून झाकण काढा व निवल्यावर सुरीच्या सहाय्याने इडल्या काढून घ्या.


रवा इडली खोबर्‍याच्या चटणी व सांबर बरोबर वाढा.

रवा इडलीमध्ये तुम्ही भाज्या घालूनही पौष्टिक करू शकता.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.