गुलाबाचे सरबत - पाककृती

गुलाबाचे सरबत, पाककला - [Rose Sarbat, Recipe] ‘क’ जीवनसत्वयुक्त ‘गुलाबाचे सरबत’ हे उष्णता आणि थकवा घालविणारे शरीरात थंडावा ठेवणारे उन्हाळ्यामध्ये याचा अवश्य उपयोग होईल.
गुलाबाचे सरबत - पाककला | Rose Sarbat - Recipe

उष्णता आणि थकवा घालविणारे गुलाबाचे सरबत

‘गुलाबाच्या सरबता’साठी लागणारा जिन्नस

  • १ किलो साखर
  • ४०० मिली. पाणी
  • १/२ लहान चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • १/४ लहान चमचा रासबेरी रेड रंग
  • १/२ चमचा रोझ इसेंस

‘गुलाबाच्या सरबता’ची पाककृती

  • प्रथम १ किलो साखरेमध्ये ४०० मिली. पाणी टाकून त्यात १/२ चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे.
  • सर्व एकत्र करून गॅसवर एक उकळी येईपर्यंत ठेवावे.
  • गार झाल्यावर त्यात रासबेरी रेड रंग व रोझ इसेंस टाकून गाळून हे लिक्विड बाटलीत भरावे.
  • सरबत देताना पाव भाग तयार केलेले लिक्विड आणि पाऊण भाग थंड पाणी किंवा थंड दूध घालून सर्व्ह करावे.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.