खास लहान मुलांसाठी भाज्या तसेच मशरूम व पनीरयुक्त असलेले चटपटीत असे सानतंग न्यूडल्स
‘सानतंग न्यूडल्स’साठी लागणारा जिन्नस
- १/२ कप बारीक कापलेले गाजर
- १/२ कापलेली काकडी
- १/२ कप कापलेली शिमला मिरची
- १ बारीक कापलेला कांदा
- ६ तुकडे मशरूम
- १/२ कप टोफु पनीर किंवा साधा पनीर
- २०० ग्रॅम सपाट न्यूडल्स (शेवया) जर उपलब्ध नसतील तर गोल न्यूडल्स चा उपयोग करू शकतात
‘सानतंग न्यूडल्स’ची पाककृती
- न्यूडल्सला उकळते वेळी १ चमचा तेल टाकावे अणि जेव्हा उकळतील तेव्हा काढून एका भांड्यात ठेवावे.
- आता भाज्यांना छोट्या छोट्या चौकोन तुकड्यांमध्ये कापावे आणि कढईत तेल टाकुन फ्राय करावे.
- यात २ कप पाणी, चवीनुसार मीठ आणि काळी मिरची पावडर टाकावे.
- हे सर्व टाकून झाल्यावर यात २ चमचे सोया सॉस टाकावे.
- घट्ट बनविण्यासाठी कार्नफ्लॉवर पेस्ट चा उपयोग करावा.
- एक प्लेट मध्ये न्यूडल्स काढुन वरून भाज्यांचे मिश्रण टाकावे.
तयार झाल्या मजेदार सानतंग न्यूडल्स. स्वतः ही खा आणि इतरांस ही खाऊ घाला.
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ