हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी - पाककृती

हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी, पाककला - [Harbhare Batatyachi Chatpatit Bhaji, Recipe] सण, उत्सव किंवा आप्तेष्टांसोबत जेवणाचा प्रसंग असो अशा वेळी ‘हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी’ हा नक्कीच एक उत्तम पर्याय ठरू शकेल, मोठ्यांसोबत लहानग्यांना देखील भाजीचा हा प्रकार फारच आवडेल.
हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी - पाककला | Harbhare Batatyachi Chatpatit Bhaji - Recipe

चटपटीत, मसालेदार अशी हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी

‘हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी’साठी लागणारा जिन्नस

 • दीड वाटी चणे (हरभरे)
 • ३०० ग्रॅम बटाटे
 • २ मोठे चमचे तेल
 • २ तमालपत्रे
 • १ चमचा जीरे
 • ३ हिरव्या मिरच्या
 • ३ लाल मिरच्या
 • ७-८ लसूण पाकळ्या
 • थोडेसे आले
 • १ वाटी चिरलेली कोथिंबीर
 • अर्धी वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस
 • चवीनुसार मीठ
 • मोठ्या लिंबाएवढी चिंच
 • ४ चमचे गूळ

‘हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी’ची पाककृती

 • हरभरे रात्रभर भिजत घालावे व सकाळी उपसून चाळणीवर निथळावे. बटाटे उकडून सोलावे.
 • हरभरे कुकरमध्ये शिजवून घ्यावे. चिंच अर्धी वाटी पाण्यात तासभर भिजत ठेवावी.
 • आले, लसूण, लाल व हिरव्या मिरच्या, खोबरे, निम्मी कोथिंबीर व जीरे एकत्र वाटावे. चिंचेचा घट्ट कोळ काढावा.
 • जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापले की त्यावर तमालपत्र घालावे. वाटलेला मसाला त्यात घालून परतावा.
 • शिजलेले चणे पाण्यासकट त्यावर घालावेत. मीठ घालावे व मंद आंचेवर ७-८ मिनिटे उकळू द्यावे.
 • नंतर त्यात चिंचेचा कोळ, बटाटे, गूळ, उरलेली कोथिंबीर घालून आवश्यक वाटल्यास थोडे गरम पाणी घालावे.
 • पाच मिनिटे चुलीवर ठेवावे व नंतर खाली उतरवून जरा मुरले की पोळी, पुरीसोबत खायला द्यावे.

स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.