तांदळाची खीर - पाककृती

तांदळाची खीर, पाककला - [Tandalachi Kheer, Recipe] मराठमोळी महाराष्ट्रीयन तांदुळाची खीर सण-उत्सवाच्या वेळी गोड पदार्थ म्हणून पुडींगसारखी खाऊ शकता.
तांदळाची खीर- पाककला | Tandalachi Kheer - Recipe

सणासुदीचा एक गोड पदार्थ ‘तांदळाची खीर’

‘तांदळाची खीर’साठी लागणारा जिन्नस


 • ७ चमचे तांदूळ (सुवासिक)
 • १ लिटर दूध
 • १० चमचे साखर
 • २ चमचे वेलदोडे पूड
 • काजू
 • बदाम
 • चारोळ्या यापैकी असेल ते (नसले तरी चालेल)

‘तांदळाची खीर’ची पाककृती


 • तांदूळ धुवून १५-२० मिनिटे पाण्यात बाजूला ठेवावेत.
 • दूध तापवून त्याला उकळी आली की त्यात पाणी काढून तांदूळ घालावे व सतत ढवळत राहावे.
 • सुमारे तीस मिनिटे मंद गॅसवर शिजवावे.
 • तांदळाचा दाणा हाताने दाबून पाहावा. मऊ झालेला असला व चटकन दाबला गेला की साखर घालावी व पाच मिनिटे आणखी गॅसवर ठेवून ढवळत राहावे.
 • फार दाट वाटल्यास कपभर दूध घालावे.
 • खाली उतरवून खीर गार झाली की त्यात वेलचीपूड व काजू, बेदाणे घालावे.

तांदळाची खीर जेवणानंतर पुडिंग म्हणून बाऊलमध्ये घालून खायला द्यावी.

टीप: तांदूळ पाण्यात भिजवल्यावर मिक्सरमधून रवाळ वाटला तर झटपट खीर होऊ शकते.


स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.