Loading ...

कचोरी - पाककृती

कचोरी, पाककला - [Kachori, Recipe] न्याहारीसाठी तसेच मधल्या वेळेत खाता येईल अशी खमंग, कुरकुरीत, चटपटीत आणि लहान मुलांना आवडणारी ‘कचोरी’ घरी बनवून पोटभर खाऊ शकता.

कचोरी - पाककला | Kachori - Recipe

खमंग, कुरकुरीत, चटपटीत कचोरी

‘कचोरी’साठी लागणारा जिन्नस

  • २५० ग्रॅम मैदा
  • सोडाबाईकार्बोनेट
  • ६५ ग्रॅम तेल
  • ८० ग्रॅम पाणी
  • १०० ग्रॅम उडीद डाळ
  • ३० ग्रॅम तूप
  • २० ग्रॅम आले
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • चिमुटभर हिंग
  • १ छोटा चमचा धणे पावडर
  • १/२ चमचा जीरे पावडर
  • १/२ चमचा साखर
  • मीठ चवीनुसार
  • १० मिली लिंबाचा रस
  • कोथिंबीर
  • तळणासाठी तेल

‘कचोरी’ची पाककृती

  • मैदा, मीठ आणि सोडाबाइकार्बोनेट एकत्र करावे. ६५ ग्रॅम तेल टाकावे आणि चांगल्या तर्‍हेने मिळवावे. पाणी ( साधारण ८० मिली) घेऊन नरम मळावे, ओल्या कपडाने झाकून एका बाजुस ठेवावे.
  • आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कापावी.
  • उडदाच्या डाळीस एक तास भिजवावे. नंतर वाटावे.
  • कढईत तेल गरम करून त्यात वाटलेली डाळ, हिरवी मिरची, आले, हिंग आणि सर्व वाटलेले मसाले टाकावे. साखर मीठ आणि लिंबू मिळवावे. गॅसवर बंद करून कोथिंबीर टाकावी आणि मिश्रणास थंड होऊ द्यावे.
  • मळलेल्या मैद्याचे १२ गोळे करावे. प्रत्येक गोळ्यास हातावर घेऊन असे पसरावे कि ते मध्ये जाड व किनारीस पातळ असावे. आता त्याच्या मध्ये तयार मिश्रण भरावे.
  • किनारीस मोडुन गोल आकार देऊन हलकेच दबून चपटे करावे.
  • कढईत तेल गरम करावे आणि कुरकुरी होईपर्यंत कचोरी लालसर होईपर्यंत तळावी.

दही किंवा चिंचेच्या चटणी बरोबर वाढावे.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची