कुळीथ पिठले - पाककृती

कुळीथ पिठले, पाककला - [Kulith Pithale, Recipe] रात्रीच्या जेवणात उत्तम तसेच महाराष्ट्रीय पदार्थ असलेले तिखट - आंबटसर कुळीथाचे पिठले भातावर सुंदर लागते.
कुळीथ पिठले - पाककला | Kulith Pithale - Recipe

महाराष्ट्रातील प्रसिद्ध चटपटीत आमटी ‘कुळीथ पिठले’

‘कुळीथ पिठले’साठी लागणारा जिन्नस
 • अर्धी वाटी कुळीथ पीठ
 • ८ - १० कडिपत्याची पाने
 • ३ - ४ हिरव्या मिरच्या
 • अर्धा चमचा मीठ
 • कोथिंबीर
 • २ आमसुले
 • २ पळ्या तेल
 • फोडणीचे साहित्य

‘कुळीथ पिठले’ची पाककृती
 • तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कडिपत्याची पाने घालून फोडणी करावी.
 • त्यात ३ भांडी पाणी घालावे. ते थोडेसे उकळायला लागल्यावर त्यात मीठ, आमसुले घालावीत.
 • कुळथाचे पीठ पाण्यात कालवून घालावे व ढवळत राहावे.
 • उकळी आली की खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व जेवताना भातावर गरम गरम द्यावे.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.