कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी - पाककृती

कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी, पाककला - [Cauliflowerchi Masaledar Bhaji, Recipe] चटपटीत, मसाला घालून केलेली ‘कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी’ तोंडाला चवच आणेल.
कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी - पाककला | Cauliflowerchi Masaledar Bhaji - Recipe

चटपटीत, मसालेदार कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी

‘कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी’साठी लागणारा जिन्नस

 • १ किलो कॉलीफ्लॉवर
 • १ वाटी धणे
 • अर्धा चमचा हळद
 • १ चमचा तिखट
 • १० लसूण पाकळ्या
 • ५ चमचे तेल
 • अर्धा चमचा मोहरी
 • १ चमचा मीठ (किंवा जास्त)

‘कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी’ची पाककृती

 • फ्लॉवर नीट करून बारीक चिरावा किंवा आवडीनुसार मध्यम तुरे ठेवावे.
 • धुवून पंधरा मिनिटे पाव चमचा हळद घातलेल्या पाण्यात बुडवून ठेवावा. नंतर चाळणीवर निथळत ठेवून पुन्हा त्यावर साधे पाणी घालावे.
 • एकीकडे लसूण, धणे, हळद व तिखट कच्चेच पाट्यावर वाटून घ्यावे.
 • पातेल्यात तेल तापले की त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की वाटलेला मसाला टाकून खमंग परतावा.
 • खाली उतरवून त्यात कॉलीफ्लॉवर घालावा व अलगद ढवळावे.
 • थोडा पाण्याचा शिपका देऊन पाण्याचे झाकण ठेवावे व मंद विस्तवावर भाजी ठेवावी.
 • दहा मिनिटांनंतर मीठ व वाटल्यास थोडे पाणी घालून भाजी पूर्ण शिजवावी.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.