जीवनसत्वयुक्त असलेले मिश्र डाळीचे वडे
‘मिश्र डाळीचे वडे’साठी लागणारा जिन्नस
- १ वाटी तुरडाळ
- १ वाटी हरभर्याची डाळ
- १ वाटी उडदाची डाळ
- १/२ वाटी मसुराची डाळ
- मीठ
- २ कांदे बारीक चिरून
- हळद
- मीठ
- तळण्यासाठी तेल
- हिंग
‘मिश्र डाळीचे वडे’ची पाककृती
- सर्व डाळी एकत्र भिजत घालाव्यात.
- ३/४ तासानंतर बारीक वाटून घ्याव्यात.
- नंतर त्यात मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हिंग, हळद घालून चांगले कालवावे.
- बारीक चिरलेला कांदा घालून लहान-लहान वडे तळून काढावेत.
- सॉस किंवा चटणीसोबत खाण्यास द्यावेत.
पालकचिरून ह्यात मिसळल्यासही छान लागतात. गाजरे किसून निम्म्या डाळीत घालावी व निम्म्या डाळीत इतर काही तरी भाज्या घालाव्यात.
पोट तर भरतेच, पण सर्व जीवनसत्वे ही मिळतात.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ