खारी शंकरपाळी - पाककृती

खारी शंकरपाळी, पाककला - [Khari Shankarpali, Recipe] खुसखुशीत, कुरकूरीत आणि खमंग खारी शंकरपाळी दिवाळी फराळाला चव आणते.
खारी शंकरपाळी- पाककला | Khari Shankarpali - Recipe

खुसखुशीत, कुरकूरीत आणि खमंग ‘खारी शंकरपाळी’


खारी शंकरपाळी - खुसखुशीत, कुरकूरीत आणि खमंग खारी शंकरपाळी दिवाळी फराळाला चव आणते. तसेच मधल्या वेळेत मुलांना खायलाही देता येते.‘खारी शंकरपाळी करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • पाव किलो मैदा
  • १ चमचा जिरेपूड
  • पाव चमचा हळद
  • १ चमचा तिखट
  • चवीनुसार मीठ
  • २ चमचे डालडा

खारी शंकरपाळी करण्याची पाककृती


  • मैदा, जिरेपूड, हळद, तिखट, मीठ व डालडाचे मोहन एकत्र करून घट्ट पीठ भिजवा. हवे असल्यास थोडे पाणी घाला.
  • तयार पीठाची पोळी जरा जाडसर लाटा.
  • सुरीच्या किंवा चकलीच्या चिरणीच्या सहाय्याने शंकरपाळ्यांचा आकारात कापा.
  • कढईत तेल तापवून त्यात तयार शंकरपाळे सोडा व मंदाग्निवर दोन्ही बाजूने तळून काढा.

खुसखुशीत व खार्‍या शंकरपाळ्या तोंडाला चव आणतात. तसेच लहान मुलांनाही मधल्या वेळेत खायला देता येतात.

टीप: पोळी पातळ लाटल्यास शंकरपाळ्या कुरकुरीत होतात आणि जाड लाटल्यास व त्यात डालडा थोडा जास्त घातल्यास खुसखुशीत होतात.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.