टोमॅटो सूप - पाककृती

टोमॅटो सूप, पाककला - [Tomato Soup, Recipe] पौष्टिक, थंडीत उपयुक्त आणि जेवणाअगोदर खाल्यामूळे भूक वाढवणारे हॉटेलसारखे ‘टोमॅटो सूप’ घरीच बनवता येईल.
टोमॅटो सूप - पाककला | Tomato Soup - Recipe

पौष्टिक आणि भूक वाढवणारे ‘टोमॅटो सूप’.

‘टोमॅटो सूप’साठी लागणारा जिन्नस

 • १ किलो टोमॅटो
 • १/२ वाटी साखर
 • १ चमचा मीठ
 • १/२ चमचा काळी मिरी
 • ब्रेडचे छोटे तुकडे

‘टोमॅटो सूप’ची पाककृती

 • सर्वात पहिले टोमॅटो पाण्यात उकळण्यासाठी ठेवावे.
 • जेव्हा टोमॅटो गळतील आणि पाणी सुकेल तेव्हा सुईच्या साहाय्याने त्यास छेदावे.
 • छेदल्यानंतर गाळुन घ्यावे. त्यात मीठ, काळी मिरी आणि साखर मिसळावी.
 • कमी गॅसवर शिजवण्यासाठी ठेवून द्यावे.
 • सुपास रंग येण्यासाठी थोडेसे बीट टाकावे.
 • जर सुप घट्ट झाले तर थोडेसे पाणी मिसळावे.
 • १० - १५ मिनीट शिजल्यानंतर गॅस बंद करावा.
 • गरम गरम वाढावे.
 • खाते वेळी वरून तळलेल्या ब्रेडचे छोटे छोटे तुकडे टाकावे.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.