रात्रीच्या जेवणाचा हलका फुलका चविष्ट ‘भाजीभात’
भाजीभातासाठी लागणारा जिन्नस
- २ वाट्या तांदूळ
- २ वाट्या कांदा
- बटाटा
- कोबी
- भोपळीमिरची
- तोंडली
- वांगी इत्यादींपैकी मिश्र फोडी
- अर्धी वाटी मोड आलेले मूग किंवा मटकी
- पाव वाटी भिजवलेले शेंगदाणे
- ४ हिरव्या मिरच्या
- अर्धी वाटी ओले खोबरे
- अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
- ६ चमचे तेल
- चवीनुसार मीठ
- २ चमचे साखर
- ४ चमचे धणे - जिरेपूड
- कडीपत्त्याची पाने
- ४ चमचे लिंबाचा रस
- फोडणीचे साहित्य
भाजीभाताची पाककृती
- तांदूळ धुवून तासभर निथळत ठेवावे.
- निम्मे खोबरे, कोथिंबीर व लिंबूरस वरून सजावटीसाठी वगळून ठेवावा.
- कुकरमध्ये मावेल अशा मोठ्या पातेल्यात तेल तापले की मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून हिरव्या मिरच्या फोडणीस टाकाव्या.
- त्यात ९ वाट्या गरम पाणी घालावे.
- मीठ, धणे - जिरेपूड, कडीपत्ता, साखर घालावी.
- पाण्याला उकळी आली की त्यात दाणे, भाजी, मूग व तांदूळ वैरावे व खिचडी ढवळावी.
- दोन मिनिटे ठेवावे. ५-७ उकळ्या आल्या की नंतर पातेले कुकरमध्ये ठेवावे.
- झाकणी ठेवून अर्धा तास शिजत ठेवावी.
- नंतर उघडून पुन्हा उलथण्याच्या टोकाने खालीवर करावी.
- बाहेर काढून पुन्हा मंद चुलीवर एक वाफ येऊ द्यावी.
- खाली उतरवून त्यावर लिंबूरस शिंपडून ढवळावे.
- वाढायच्या भांड्यात काढून त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर घालावी.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ