चुरमुर्यांचे पापड - पाककृती
चुरमुर्यांचे पापड, पाककला - [Churmuryanche Papad, Recipe] जेवणामध्ये पापडाचे एक वेगळे स्थान असल्यामुळे तसेच एक वेगळी खमंग, चविष्ट चव म्हणुन ‘चुरमुर्यांचे पापड’ करु शकता.
खमंग, चविष्ट ‘चुरमुर्यांचे पापड’
‘चुरमुर्यांचे पापड’साठी लागणारा जिन्नस
- चुरमुरे
- बेताची हिरवी मिरची
- कोथिंबीर
- धणे
- जिरेपूड
- चवीनुसार मीठ
- लसूण
- आले
‘चुरमुर्यांचे पापड’ची पाककृती
- तीन तास चुरमुरे पाण्यात भिजत घालावे.
- त्यानंतर ते गाळून त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण - आलं यांची पेस्ट घालावी.
- बेताची धणे - जिरे पूड, चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र करुन कणकेप्रमाणे मळावे.
- चांगला गोळा करून घ्यावा.
- नंतर लहान लिंबाएवढे गोळे करून प्लास्टिकवर गोळा ठेवून लाटा व उन्हात वाळवा.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.