Loading ...
/* Dont copy */

मटण हंडी - पाककृती

मटण हंडी, पाककला - [Mutton Handi, Recipe] मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीमध्ये बनवलेली ‘मटण हंडी’ खमंग व स्वाद वाढवते.

मटण हंडी - पाककला | Mutton Handi - Recipe

खमंग, चविष्ट ‘मटण हंडी’ तुमच्या मांसाहारी जेवणाची शान वाढवेल.

‘मटण हंडी’साठी लागणारा जिन्नस

  • १ किलो मटणाचे तुकडे
  • ७ किसलेले कांदे
  • २ इंच आल्याची पेस्ट
  • मीठ
  • अर्धा चमचा साखर
  • ४ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा कोथिंबीर
  • २ कप दही
  • १ लसणाची पेस्ट
  • अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी
  • दीड चमचा लाल मिरची
  • १ चमचा हळद
  • २ बारीक केलेले टोमॅटो
  • १ चमचा गरम मसाला

‘मटण हंडी’ची पाककृती

  • प्रथम मटणाला अर्धी आलं-लसूण पेस्ट व दही लावून दोन तास ठेवा.
  • एका मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीत २ चमचे तेल गरम करून त्यात कांदे लाल होईस्तोवर परता.
  • त्यात लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला घालून परता.
  • त्यात उरलेली आले-लसूण पेस्ट, बारीक केलेले टोमॅटो, मटण व मीठ घालून परता.
  • झाकण लावून झाकणावर पाणी ठेवून मटण शिजू द्या.
  • शेवटी साखर घालून ढवळा, वरून कोथिंबीर पेरा.
  • गरमागरम हंडी मटण जिरा राईस वा रोटीसोबत सर्व्ह करा.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची