Loading ...
/* Dont copy */

फ्रूट केक - पाककृती

फ्रूट केक, पाककला - [Fruit Cake, Recipe] १५ दिवस टिकणारा आणि फळांनी युक्त असलेला ‘फ्रुट केक’ लहान मुलांना नक्कीच आवडेल.

फ्रूट केक - पाककला | Fruit Cake - Recipe

लहान मुलांना प्रिय असलेला आणि फळयुक्त ‘फ्रूट केक’

‘फ्रूट केक’साठी लागणारा जिन्नस

  • १ कप साखर
  • १ १/२ कप लोणी किंवा डालडा
  • २ संत्री
  • ५ अंडी
  • २ १/२ कप मैदा
  • १ टी स्पून बेकिंग पावडर
  • १/२ चमचा मीठ
  • ५० ग्रॅम बारीक चिरलेले काजू
  • ५० ग्रॅम करंट्स
  • ५० ग्रॅम बेदाणा
  • २५ ग्रॅम चेरीज्‌
  • १० ग्रॅम साल काढलेले बदाम

‘फ्रूट केक’ची पाककृती

  • डब्याला पातळ डालडा लावून ठेवावा.
  • ओव्हनचे तापमान ३७५ डि. F. असावे किंवा १५० डि. C असावे.
  • लोणी व साखर खूप फेसून घ्यावे.
  • अंड्यातले पिवळे व पांढरे बाजूला करुन पांढरे खूप फेसून घ्यावे.
  • पिवळेही थोडे फेसून घ्यावे व लोणी साखरेत मिसळावे,
  • नंतर त्यात चाळलेला मैदा, मीठ व बेकिंग पावडर हळुहळु घालावे.
  • थोड्या मैद्यात (१ टे.स्पू) सर्व फ्रूटचे तुकडे घोळवून तेही घालावेत.
  • संत्र्याचा रस थोडा थोडा घालत मिश्रण सारखे करावे.
  • नंतर डालडा लावलेल्या डब्यात घालून वरच्या बाजूला बदामाचे काप लावावेत.
  • २५ ते ३० मिनीटे हे मिश्रण बेक करावे.
  • केकमध्ये सुरी किंवा टुथपिक घालून काढावी, स्वच्छ आली की केक झाला असे समजावे.
  • हा केक १५ दिवस छान राहतो.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची