तुकाराम गाथा - अभंग २

तुकाराम गाथा, अभंग २ - [Tukaram Gatha, Abhang 2] सुंदर तें ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवूनियां.
तुकाराम गाथा - अभंग २ - भाग १/२ | Tukaram Gatha - Abhang 2 - Part 1/2

संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम गाथेतील अभंग २, सुंदर तें ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवूनियां

तुकाराम गाथा - अभंग २

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनियां ॥१॥

तुळसीहार गळां कांसे पितांबर ।
आवडे निरंतर तेंचि रूप ॥ध्रु॥

मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥

तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
- संत तुकाराम

तुकाराम गाथा - अभंग २

तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा #तुकाराम गाथा


अभिव्यक्ती / विचारधन


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.