महाराष्ट्र

महाराष्ट्र | Maharashtra
कावळेसाद पॉइंट - आंबोली. छायाचित्र: हर्षद खंदारे

महाराष्ट्र - [Maharashtra] जगप्रसिद्ध भारतवर्षातील महाराष्ट्र हे एक महान सांस्कृतिक परंपरा लाभलेले वैभवशाली राज्य आहे. गड - किल्ले, तीर्थक्षेत्रे, मंदिरे, कोरीव लेणी, नैसर्गिक सुंदर सागर किनारे, अभयारण्ये यांची रेलचेल महाराष्ट्रात पहायला मिळते. माझा महाराष्ट्र

रमणीय निसर्गाच्या कुशीत मोकळा श्वास घेवुन ताजेतवाने व्हावे हाच उद्देश समोर ठेवुन आम्ही ‘महाराष्ट्र’ हे सदर खुद्द महाराष्ट्रास समर्पित करीत आहोत.

प्रचंड धरणे त्यांचे सागरासारखे जलाशय ही येथील आधुनिक तीर्थक्षेत्रे आहेत. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे, देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई महानगर, प्राचीन व ऎतिहासिक महत्व असलेले कोल्हापूर, मंदिरांचे शहर नाशिक, पर्यटण व औद्योगिक क्षेत्रात पुढे येत असणारे औरंगाबाद, उद्योगनगरी सोलापूर, नाथांचे पैठण, देशातील मध्यवर्ती असलेली महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, तसेच सांगली आणि ‘वारली’ या आदिवासी चित्रकलेचे जन्म ठिकाण असलेला ठाणे जिल्हा. अशी किती तरी ऎतिहासिक, औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेली शहरे महाराष्ट्रात आहेत तर अजिंठा - वेरूळ येथील लेण्यांनीमहाराष्ट्राचे नाव जागतिक नकाशावर कोरले आहे. अशा या महाराष्ट्रात अनेक नवी - जुनी पर्यटणस्थळे उदयास आली आहेत. या पर्यटणस्थळी जाऊन आपण चार घटका आनंदाचा अनुभव घ्यावा. रमणीय निसर्गाच्या कुशीत मोकळा श्वास घेवुन ताजेतवाने व्हावे हाच उद्देश समोर ठेवुन आम्ही ‘महाराष्ट्र’ हे सदर खुद्द महाराष्ट्रास समर्पित करीत आहोत.

माझा महाराष्ट्र

राकट, कणखर कलाकारांचा देश

महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्याची सखोल माहिती

इतिहास

महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास

सैर सपाटा

महाराष्ट्राचा अविस्मरणीय सैर सपाटा

संस्कृती

महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचे दालन

कला

महाराष्ट्रातील लोककलांची ओळख

मराठी साहित्य

मराठी साहित्यास समर्पित विभाग

खेळ

महाराष्ट्राच्या मातीतले रांगडे खेळ

महाराष्ट्रीयन पदार्थ

अस्सल मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

महाराष्ट्र फोटो गॅलरी

वैभवशाली महाराष्ट्राचे छायाचित्र दर्शन