मुकुंद शिंत्रे

मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद


  १९६२      नाशिक, महाराष्ट्र (भारत)


मुकुंद शिंत्रे यांचा बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध होता. तारुण्यात येईपर्यंतच्या काळात ते मुख्य शिक्षक झाले होते. पुढे बौद्धिक प्रमुख म्हणून स्थानिक पातळीवरील संघीय जबाबदारीची कामे त्यांनी केली आहेत. गुजराथमधील राखीव जागांविरोधी आंदोलनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे वितुष्ट निर्माण झाले.

मुकुंद शिंत्रे यांचा ‘एक बामण ढसाळलेला’ हा कवितासंग्रह आणि ‘संघाचा बुरखा’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून नाशिकमधील विविध दैनिकांतून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर सातत्याने विचारप्रवर्तक लेखन केले आहे, विशेषतः दैनिक रामभूमीतून त्यांनी अधिक लेखन केले आहे.

सध्या नाशिकच्या दि नासिक मर्चंट्स को - ऑप. बॅंकेत नोकरीस. विविध सामाजिक चळवळीतील कृतिशील सहभाग हे त्यांच्या लेखनाचे पाठबळ म्हणून सांगता येईल.

मुकुंद शिंत्रे यांचे लेखन    मुकुंद शिंत्रे यांचे सर्व लेखनआमच्याबद्दल