Loading ...
/* Dont copy */

मी चित्तपावन - मराठी कविता (मुकुंद शिंत्रे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मुकुंद शिंत्रे (मुकुंद मोरेश्वर शिंत्रे) यांची मी चित्तपावन ही लोकप्रिय मराठी कविता.

मी चित्तपावन - मराठी कविता (मुकुंद शिंत्रे)

मी शुद्ध चित्पावन कोंकणस्थ ब्राम्हण, गोरा नाही, घारा नाही म्हणून बेरकीही नाही...

मी चित्तपावन

मुकुंद शिंत्रे (कवितासंग्रह:एक बामण ढसाळलेला । नाशिक, महाराष्ट्र)

मी शुद्ध चित्पावन कोंकणस्थ ब्राम्हण गोरा नाही, घारा नाही म्हणून बेरकीही नाही वर्णव्यवस्थेचा पुरस्कर्ता तर नाहीच नाही म्हणुन म्हणतो आपल्यातला म्हणुन समजु नका मिसरुड फुटण्याआतच आंबेडकर वाचुन ढसाढसा रडलो आक्रंदलो, संतापलो आणि संस्कृतीवर यथेच्छ थुंकलो त्याचवेळी खरा मी चित्तपावन झालो क्रांतीशिखेच्या तप्त ज्वालेत जानवं जाळलं बुद्धाला गळ्यात वागवलं तरीही मी ब्राम्हणच ठरलो मात्र एक मराठ्यानं ‘धेडपट’ म्हणताच तळपायाची भिरभिरत मस्तकात घुसली ‘धेड’ असतो तर भडव्याची नरडीच घोटली असती. तरीही मी थंडच होतो कारण मी भुदेव होतो काहीही न करणारेच फक्त अंतर्मुख होतात पण या षंढ संस्कृतीनं मलाही षंढच बनवलं म्हणुनच फुक्कटच्या फाकट अंतर्मुख झालो षंढ असल्यावर अंतर्मुख होणे केव्हाही चांगले माटेमास्तरांची याद उसळुन वर आली म्हणुनच ‘महाराचं’ बिरुद मी मानानं वागवलं तेच म्हणुन घरच्यांनीही हिणवलं-शिणवलं तेव्हा तेव्हा मात्र खरोखरीच मी महार झालो आगलावी आक्रस्तळेपणा होता म्हणुन मी ढसाळ ही बनलो आणि संस्कृतीला सणसणीत लगावून क्रांतीदुतही झालो तरीही मी थंडच होतो कारण मी भुदेव होतो रानडे, आगरकर, माटे सावरक माझे म्हणुनही मी खुष झालो आणि ‘आंबेडकरी तत्त्वज्ञान’ घेऊन मोकाट सुटलो नव्या जातभाईनं ‘तुही जात कंची’, असं विचारताच मी पुरता निखळलो, तुटलो आणि सुन्न झालो तरीही मी थंडच होतो कारण मी भुदेव होतो

मुकुंद शिंत्रे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची