प्रेम - मराठी कविता

प्रेम, मराठी कविता - [Prem, Marathi Kavita] माझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे, म्हणूनच तुझ्या सगळयाच गोष्टीवर मी फिदा आहे.

माझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे, म्हणूनच तुझ्या सगळयाच गोष्टीवर मी फिदा आहे

माझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे
म्हणूनच तुझ्या सगळयाच गोष्टीवर मी फिदा आहे
तु जेव्हा माझ्या बाईकवर बसशील
स्कार्फ तू लपेटून घे
नसशील सुंदर तरी चालेल पण पर्स तुझी भरुन घे
मी जेव्हा फोन करीन धावत-धावत भेटायला ये
होत असेल गरम तरीसुध्दा माझ्याबरोबर
टपरीवरचा फक्कड चहाच घे
वाढदिवस तुझा असेल तेव्हा माझा गुलाब प्रेमाने घे
फुलामध्येच हिरे मोती सगळं काही तू पाहून घे
असेच प्रेम करु जन्मभर...
पण असेल तुझा लग्नाचा विचार तर खिसा माझा
पाहून नोकरी तू शोधून घे
यामध्ये तुला जे समजायचे ते समजून घे
पण माझं तुझ्यावर खरचं खूप प्रेम आहे
म्हणून तुझ्या सगळ्याच गोष्टीवर मी फिदा आहे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.