Loading ...

पायवाट - मराठी कविता

पायवाट, मराठी कविता - [Paayvaat, Marathi Kavita] पायाखालची वाट, सरत होती, मी मात्र, तिथंच, वाटेच्या हिशेब करत.

पायाखालची वाट, सरत होती, मी मात्र, तिथंच, वाटेच्या हिशेब करत

पायाखालची वाट
सरत होती
मी मात्र
तिथंच!
वाटेच्या हिशेब करत!
बाळपणीच्या फोटोत
दुडुदुडु धावणारी वाट
शाळेच्या रस्त्यात हरवली
नव्या रस्त्यात भेटली
अनेक स्वप्नं... आदर्श
ती स्वप्नं रंगवत
आदर्शांचा मागोवा घेत
शाळेचा रस्ता ओलांडला,
महानगरासारख्या कॉलेजात
केवळ रस्ता नव्हता...
होते चौक...
एकाच वेळी अनेक वाटा जोडणारे
भुलभुलैय्या ठरणारे...
आपली वाट कोणती
कळलंच नाही...
रस्सीखेच...!
वेगवेगळ्या वाटेनं ओढली गेले
त्या ओढण्यात
आपली वाट सापडलीच नाही
प्रत्येकवेळी दुसऱ्यानेच वाट दाखवली
त्याना हवी ती...
कालांतरानं सगळे
आपापल्या वाटेनं गेले,
आणि मी...
मी बसले आडवाटेत
कुठं जायचं याचा विचार करत


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची