झोपडीत बसून, चांदण्या मोजत, जगणारी मी
झोपडीत बसूनचांदण्या मोजत
जगणारी मी,
तुझ्या.....
शीश महालाच्या
आश्वासनानं
बेभान, बेधुंद!
मी स्वप्नातच...
कसा असेल शीश महल?
खरंच तुसं आश्वासन
की..?
कधी कधी
तू अस्वस्थ....
अविश्वासक
वाटत असतानाच
विवाहापूर्वीच,
मला दाखविलास
आरसेमहाल!
मी पुन्हा...
बेभानं, बेधुंद
त्याच क्षणी...
तू..
एकाच वेळी
मला दिसली
माझ्या देहाची
असंख्य लक्तरं
त्या शीशमहालात!
तेव्हा कळलं....
चांदण्या मोजत
मी
सुरक्षित होते