Loading ...
/* Dont copy */

रक्तरंजित तो वाडा भाग २ – भयकथा (इंद्रजित नाझरे)

मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे नोंदणीकृत सभासद लेखक ‘इंद्रजित नाझरे’ यांच्या ‘रक्तरंजित तो वाडा’ या मराठी भयकथेचा भाग २.

रक्तरंजित तो वाडा भाग २ – भयकथा (इंद्रजित नाझरे)

अमोलच्या हातात असलेला रक्ताळलेला चाकू, त्याची सुन्न नजर आणि त्या बंद वाड्यात घडलेल्या भीषण हत्याकांडामागच्या भूतकाळाचा उलगडा करणारा कथेचा दुसरा भाग...

रक्तरंजित तो वाडा भाग २

इंद्रजित नाझरे (इचलकरंजी, महाराष्ट्र)

प्रस्तावना
प्रस्तुत भागात लेखकाने पहिल्या भागात निर्माण केलेल्या रहस्याचा माग घेतला आहे. देसाई वाड्यात घडलेल्या त्या रक्तरंजित घटनेनंतर, पोलीस कोठडीत अमोलने आपल्या डोळ्यांतील अश्रूंना वाट करून देत पोलिसांसमोर आपला भूतकाळ उलगडला आहे. त्याचे मोनिकावरील प्रेम, आय.टी. कंपनीतील त्यांचे सुरुवातीचे दिवस आणि पुढे विवाहापछात नात्यात आलेली कटुता या प्रवासाचा संदर्भ देऊन कथेतील गूढता अधिक प्रभावीपणे मांडली आहे.

"मी पुण्यातील एका नामांकित आय.टी. कंपनीत कामाला होतो. माझे वडील पेशाने शिक्षक आणि आई गृहिणी. दोघांनी प्रचंड काबाडकष्ट करून मला लहानाचे मोठे केले. त्यांच्या कष्टाचे चीज करत उच्च शिक्षण घेऊन मी त्या मोठ्या कंपनीत रुजू झालो होतो. माझी कार्यालयीन सहकारी मैथिली आणि मी प्रोजेक्ट डिपार्टमेंटमध्ये एकत्र काम करायचो..." पोलीस कोठडीत समोर ठेवलेला तो जुना फोटो पाहून अमोल सांगत होता आणि पोलिसांसमोर दीड वर्षांपूर्वीचा तो काळ एका चित्रपटासारखा उभा राहू लागला. एकेदिवशी मी आणि मैथिली एका सॉफ्टवेअरवर बराच वेळ काम करत होतो. रात्रीचा दीड वाजला तरी आमचे काम संपत नव्हते. तेवढ्यात, "मैथिली... ए मैथिली!" अशी हाक आम्हा दोघांच्या कानी पडली. मैथिलीला शोधत एक तरुणी आमच्या केबिनमध्ये आली. ती आत येताच म्हणाली, "अगं ए वेडे, किती वाजलेट? घरी जायचं नाही का? आज जर जास्त उशीर झाला ना, तर मला तुझ्याच घरी मुक्काम करावा लागेल!" "ओह, आय एम सॉरी! बघ ना, हा प्रोजेक्ट पूर्ण होतच नाहीये, मी तरी काय करू!" मैथिलीने तिला उत्तर दिले. मी घड्याळाकडे पाहिले, पावणेदोन झाले होते. मी म्हणालो, "मैथिली, आज आपण इथेच थांबवूया. खूप उशीर झाला आहे, बाकीचे काम उद्या करू." मैथिली माझ्याशी सहमत झाली. दोघांनी ऑफिसचे संगणक बंद केले आणि आम्ही तिघेही इमारतीबाहेर पडलो. मैथिली आणि माझे अपार्टमेंट एकाच भागात होते. "मैथिली, ही कोण आहे?" मी त्या नवीन मुलीचा परिचय विचारला. "अरे, ही माझी मैत्रीण मोनिका... मोनिका कोरवी!" मैथिलीने ओळख करून दिली. रस्त्यावर रात्रीच्या वेळी आम्ही तिघेच होतो. एका कॅबमधून आम्ही घराच्या देशाने निघालो. मागच्या सीटवर मैथिली आणि मोनिकाची आपापसात चेष्टा-मस्करी सुरू होती. अचानक गाडीच्या समोरील आरशात (Rear-view mirror) मोनिका आणि माझी नजरानजर झाली. दोघेही शांत होते, पण त्या एका क्षणात आमच्या मनात सुप्त आकर्षणाने शिरकाव केला होता. तोच हा फोटो, जो आज तुम्ही मला दाखवत आहात! आगे काळ सरकत गेला. मोनिका वारंवार मैथिलीला भेटण्याचे कारण काढून माझ्या नजरेसमोर येऊ लागली. पाहता पाहता आमच्यात मैत्रीचे नाते घट्ट झाले आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता आम्ही रोज भेटू लागलो; कधी बागेत तर कधी कॉफी शॉपमध्ये. एकदा मी मोनिकाला फोन केला, पण तिचा फोन वारंवार व्यस्त (Busy) येत होता. तब्बल दोन तासांनी तिने मला उलट फोन केला. मी फोन व्यस्त असण्याबाबत विचारले, तेव्हा तिने काहीतरी थातुरमातुर कारण सांगून वेळ मारून नेली. तेव्हा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली नव्हती. काही महिन्यांनी मी आमच्या नात्याला विवाहाचे रूप देण्याचा निर्णय घेतला. माझे मोनिकावर जिवापाड प्रेम होते. मी तिच्यावर मनासारखा पैसा खर्च करायचो. तिच्या वाढदिवशी तर मैं अख्खे कॉफी शॉप आणि एक सिनेमा थिएटर बुक केले होते. पण मोनिका केवळ वरवर माझ्याशी एकनिष्ठ असल्यासारखे दाखवायची. मी समोर आलो की ती प्रेमाने बोलायची, पण मला कधीही स्वतःच्या जास्त जवळ येऊ द्यायची नाही. ती असे मुद्दाम करायची की त्यामागे आणखी काही कारण होते, हे मला तेव्हा कळत नव्हते. अखेर एक चांगला मुहूर्त पाहून आमचा विवाह झाला. लग्नानंतर पुण्यातील नोकरी सोडून मी आमच्या दानोळी गावात परतलो. तिथे वडिलांची शेती आणि दुग्ध व्यवसाय सांभाळू लागलो. सुरुवातीचे काही दिवस मोनिकाने सुखी संसाराचे नाटक उत्तम वठवले. पण हळूहळू तिला घरातील सासूबाईंची टोमणे, तिथली बंधने आणि ग्रामीण जीवनशैली त्रासदायक वाटू लागली. तिला सोशल मीडियाचे भयंकर वेड होते. ती घरकामात लक्ष देण्याऐवजी सतत स्वतःचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात, रील्स बनवण्यात व्यग्र असायची. साहजिकच तिचे संसाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. एकदा-दोनदा माझ्या आईने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण पालथ्या घड्यावर पाणी! आईने ही गोष्ट मला आणि बाबांना बोलून दाखवली. आम्हीही तिला प्रेमाने सांगून पाहिले, पण 'रे माझ्या मागल्या' प्रमाणे तिचे वर्तन बदलले नाही. उलट, आमचे हे सांगणे तिला खटकू लागले. लग्नानाला तीन महिने पूर्ण झाले होते, पण आमच्यात पती-पत्नीसारखे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते. एका रात्री मी धीर करून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण तिने मला झटकून दूर सारले. मी वैतागून म्हणालो, "मोनिका, नक्की काय झालंय तुला? तू मला जवळ का येऊ देत नाहीस? लग्नानाला तीन महिने झाले, तरी तू मला साधा स्पर्शही करू देत नाहीस?" असे म्हणत मी तिला जवळ ओढले. पण मोनिकाला ते सहन झाले नाही; तिने मला ताकदीने पलंगावरून थेट खाली ढकलून दिले. या अपमानामुळे माझा संताप अनावर झाला. त्या रात्री आमच्यात कडाक्याचे भांडण झाले. दुसरा दिवस उजाडला. मी आणि बाबा कामानिमित्त शेतावर गेलो, तर आई महादेव मंदिरात दर्शनासाठी गेली. ही तीच सकाळ होती, ज्या दिवशी दानोळी गावातून पश्या धावत सरपंचांच्या वाड्यावर गेला होता! मी आणि घरचे लोक बाहेर गेल्यावर मोनिका नेहमीप्रमाणे दुपारी उशिरा उठली. तिने हातात मोबाईल घेतला आणि सोशल मीडिया उघडला. तिथे तिला तिच्या आठ वर्षे जुन्या मित्राची 'फ्रेंड रिक्वेस्ट' आलेली दिसली. तिने ती लगेच स्वीकारली. त्याचे नाव होते—पंकज. पंकजचा फोटो पाहताच मोनिकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहू लागला आणि या सुखी संसाराला एका अघोरी वळणाची ठिणगी पडली. (क्रमशः)

अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची