Loading ...
/* Dont copy */

ट्रिप टू राजस्थान भाग २ - भयकथा (इंद्रजित नाझरे)

ट्रिप टू राजस्थान भाग २ - भयकथा (इंद्रजित नाझरे) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक इंद्रजित नाझरे यांची ट्रिप टू राजस्थान भाग २ ही मराठी भयकथा.

ट्रिप टू राजस्थान भाग २ - भयकथा (इंद्रजित नाझरे)

राजस्थानातील एका रहस्यमय किल्ल्याच्या प्रवासात पाच मैत्रिणींना अनपेक्षित आणि भयावह अनुभवाचा सामना करावा लागतो...

ट्रिप टू राजस्थान भाग २

इंद्रजित नाझरे (इचलकरंजी, महाराष्ट्र)

प्रस्तावना
साहस, उत्सुकता आणि थोडीशी बेफिकिरी यांच्या मिश्रणातून काही प्रवास आयुष्यभर लक्षात राहतात—कधी सुंदर आठवणींमुळे, तर कधी अंगावर काटा आणणाऱ्या घटनांमुळे. स्नेहल आणि तिच्या मैत्रिणींची राजस्थानच्या प्राचीन किल्ल्यांची ही सहलही अशीच एका गूढ वळणावर येऊन थांबते, जिथे इतिहास, अफवा आणि अदृश्य शक्तींची सावली एकत्र येते.

स्नेहल सकाळी लवकरच बाहेर पडते. ट्रिपसाठी लागणारे सर्व साहित्य तिने रात्रीच बॅगेत भरून ठेवलेले असते. सर्वप्रथम ती निशा देसाईंच्या घरी जाते. रात्रीच तिने निशाला टेक्स्ट मेसेज करून कळवलेले असते. त्यामुळे निशा गेटवर तिची वाट पाहत उभी असते. स्नेहल आलेली पाहून निशा फार आनंदित होते. “बरं, पटकन बस. पल्लूला आणायला जायचं आहे. एव्हाना तिचे दोन मिस कॉल मला आले असतील,” असे म्हणत दोघी पल्लवी देशमुखच्या घराकडे निघतात. पल्लवीच्या घराबाहेर पोहोचल्यावर त्या पाहतात की पल्लवी आत चहा पित बसलेली असते. दोघींना पाहताच ती घाईघाईने चहा संपवते, बॅग उचलते आणि घराबाहेर येते. आता त्या तिघी निकिता कुमठेकरच्या घराच्या दिशेने निघतात. निकिताच्या घराबाहेर पोहोचून जवळपास पंधरा मिनिटे होतात; तरी ती बाहेर येत नाही. स्नेहल घरात जाणार इतक्यात निकिता हळूच मागून येते आणि पल्लवी व निशाला “भाऊ!” म्हणत भीतीचा ढप्पा घालते. दोघी अचानक दचकतात आणि नंतर हसू लागतात. त्या स्नेहलला हाक मारून बोलावतात. आता त्या चौघी कोमल देशपांडेला घ्यायला तिच्या घरी जातात. कोमलच्या घराबाहेर आल्या आल्या स्नेहल जोरजोरात हॉर्न वाजवू लागते. “All right, all right, I am coming!” असे म्हणत कोमल त्वरित गाडीत बसते. अशा प्रकारे पाचही मुली मुंबई–दिल्ली एक्स्प्रेसवेवरून राजस्थान राज्यातील प्राचीन किल्ले व महाल पाहण्यासाठी निघतात. प्रवासात त्यांना गुजरातमधील निसर्गरम्य प्रदेश आणि मध्य प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्ती पाहायला मिळते. पाच जणींपैकी स्नेहल आणि निकिता यांनाच फोर-व्हीलर चालवता येत असल्याने त्या आलटून-पालटून गाडी चालवत असतात. प्रवासात त्यांची मौजमजा सुरूच असते. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर असलेल्या एका छोट्या हॉटेलमध्ये त्या नाश्ता व जेवणासाठी उतरतात. सायंकाळची वेळ असते. “अगं, हे हॉटेल फार जुनं वाटत नाही का? आणि बघ ना, इथे फारसे ग्राहकही नाहीत,” निशा दबक्या आवाजात म्हणते. खरंच, त्या हॉटेलमध्ये फारसे कोणी नसते—एक-दोन वेटर आणि दोन-तीन ग्राहक एवढेच. “पण राजस्थान तर खूप मोठं आहे. तिथे आपण नेमकं काय पाहायचं?” कोमल विचारते. “बघू गं. तिथे खूप काही पाहण्यासारखं आहे. माझे काका जयपूरला गेले होते; त्यांनी खूप ठिकाणं सांगितली होती,” स्नेहल म्हणते. इतक्यात ती आपल्या आयपॉडवर राजस्थानमधील प्रमुख पर्यटनस्थळे शोधते. लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर अलवर जिल्ह्यातील ‘दौलतगढ’ नावाचा किल्ला दिसतो. त्या किल्ल्याबाबत अनेक अफवा पसरलेल्या असतात—भारतीय ऐतिहासिक विभागाने सूर्यास्तानंतर तिथे थांबण्यास मनाई केली आहे, किल्ला शापित आहे वगैरे. “आपण हेच ठिकाण पाहायला जायचं,” स्नेहल उत्साहाने म्हणते. “कोणतं ठिकाण?” निकिता विचारते. “दौलतगढ!” स्नेहल जोरात म्हणते. तिच्या तोंडून ते नाव ऐकताच हॉटेलमध्ये बसलेले लोक काही क्षण स्तब्ध होतात. नाश्त्याचे पैसे देऊन स्नेहल आपल्या जिप्सीकडे जाते. तिच्यामागोमाग निशा, पल्लवी आणि कोमल बाहेर पडतात. त्यांची गाडी पुढे निघून जाते. मात्र त्यांच्या नजरेआड होताच हॉटेलमधील चार-पाच ग्राहक आणि वेटर अचानक विचित्रपणे बदलू लागतात—जणू त्यांच्या आत्म्यांचेच रूप उरते. ते एकमेकांकडे पाहून गूढपणे हसू लागतात. त्या पाच मुलींची अवस्था देखील लवकरच त्यांच्यासारखीच होणार आहे, हे त्यांना ठाऊक असते. गाडी गुजरात ओलांडून राजस्थानात प्रवेश करते. वाटेत ती एका चर्चसमोरून जाते. चर्चवरील सरळ क्रूस गाडीच्या मिररमध्ये क्षणभर उलटा दिसतो. गुगल मॅपवर त्यांना दौलतगढचा मार्ग मिळतो. स्नेहल गाडी त्या दिशेने वळवते. दौलतगढ किल्ला अलवर जिल्ह्यातील एका छोट्या गावाजवळ असतो. गावात मोजकीच वस्ती असते. किल्ल्याबाहेर भारतीय पुरातत्त्व विभागाची एक पाटी असते—“सूर्यास्तानंतर येथे कोणीही थांबू नये किंवा किल्ल्यात प्रवेश करू नये.” गाडीची हेडलाईट त्या पाटीवर पडते आणि काही क्षणांनी त्या पाचही मुली किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतात. चहुबाजूंनी गडद अंधार पसरलेला असतो. दौलतगढ हा अत्यंत प्राचीन किल्ला असतो. म्हणतात, राजा भोज यांच्या काळात त्याचे बांधकाम झाले. त्या किल्ल्याबाबत अनेक अफवा प्रसिद्ध आहेत—अमावस्येच्या रात्री किल्ल्यातून लग्नाच्या सनई-चौघड्यांचे सूर ऐकू येतात, असे दौलतगढचे गावकरी सांगतात. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी तिथे थांबण्यास सक्त मनाई आहे. स्नेहल गाडीतून उतरते. पाचही मुली आता किल्ल्यापाशी उभ्या असतात. पण राहायचे कुठे, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो. “अगं, आपण आज राहायचं कुठे?” कोमल विचारते. “इथे राहायला जागा आहे का? मला तर फार भीती वाटते.” तिच्या बोलण्यावर बाकी चारही मुली हसू लागतात. “अगं, एवढं काय घाबरतेस? आम्ही आहोत ना. चल, आत जाऊ,” स्नेहल म्हणते. मागचा-पुढचा विचार न करता त्या पाचही जणी किल्ल्यात प्रवेश करतात. पण त्यांच्या या प्रवेशाने किल्ल्यातील अदृश्य दुष्ट शक्ती जागृत होते—याची मात्र त्यांना कल्पना नसते. किल्ल्यात सर्वत्र अंधार पसरलेला असतो. त्यांच्या जवळ आपत्कालीन वापरासाठी काही साधने असतात. मोबाईलची टॉर्च लगेच चालू होत नाही. म्हणून कोमल आणि स्नेहल मशाल पेटवतात. मशालीचा प्रखर प्रकाश अंधार चिरत पुढे जातो. इतक्यात किल्ल्याच्या आतील भागातून वटवाघुळांचा मोठा थवा कल्लोळ करत बाहेर पडतो. त्या थव्यामधील काही वटवाघुळे निकिताला चावतात. ती जखमी होऊन खाली कोसळते. पल्लवी तिला उठवायला आधार देते. “गाईज, आपण इथे येऊन चूक तर केली नाही ना? मला इथे काहीतरी विचित्र वाटत आहे,” निशा घाबरलेल्या सुरात म्हणते. “अगं काही नाही. पक्षीच होते ते. एवढं काय घाबरायचं?” स्नेहल तिला धीर देते. “नको. आपण परत गाडीत जाऊ आणि उद्या सकाळी इथे येऊ,” पल्लवी म्हणते. कोमलही तिच्याशी सहमत होते. त्या माघारी फिरतात. पण थोडं पुढे गेल्यावर त्यांना बाहेर जाण्याचा रस्ता दिसेनासा होतो. मशाल हळूहळू विझू लागते. “अरे, आपण इथूनच आत आलो होतो ना?” स्नेहल विचारते. पण बाकी चौघी शांत उभ्या असतात. कोणीच उत्तर देत नाही. क्षणात मशाल विझून जाते. गडद अंधार सगळीकडे पसरतो. स्नेहल बॅगेतून लायटर काढते आणि आजूबाजूला प्रकाश टाकते. पण त्या क्षणी तिच्या अंगावर शहारे येतात. कारण तिच्या समोर उभ्या असलेल्या मैत्रिणींच्या जागी… फक्त हाडांचे सापळे उभे असतात.

संपादकीय विश्लेषण
ही कथा साहसी प्रवासाच्या साध्या सुरुवातीपासून हळूहळू गूढ आणि भयप्रद वातावरणाकडे वळते. सुरुवातीला मैत्रिणींच्या संवादातून आणि प्रवासातील हलक्याफुलक्या प्रसंगांतून वाचकाला सामान्य सहलीचा अनुभव दिला जातो. यामुळे पुढे येणाऱ्या भयकथनासाठी आवश्यक असा वास्तवाचा आधार तयार होतो. कथेतील मुख्य प्रभाव वातावरणनिर्मितीतून निर्माण होतो. सुनसान हॉटेल, लोकांची अचानक झालेली स्तब्धता, गाडीच्या मिररमध्ये उलटा दिसणारा क्रूस आणि सूर्यास्तानंतर प्रवेशबंदी असलेला किल्ला—ही सर्व सूचक चिन्हे वाचकाला येणाऱ्या संकटाची आधीच जाणीव करून देतात. अशा संकेतांमुळे कथेत उत्कंठा आणि अस्वस्थता हळूहळू वाढत जाते. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर अंधार, मशालीचा प्रकाश, वटवाघुळांचा थवा आणि हरवलेला मार्ग या घटकांनी भीतीची तीव्रता अधिक वाढवली आहे. पात्रांची मनःस्थिती—उत्साहातून संशय आणि नंतर स्पष्ट भीतीकडे होणारा प्रवास—कथेला नैसर्गिक प्रवाह देतो. शेवटचा दृश्यात्मक धक्का कथेला ठळक आणि स्मरणीय बनवतो. एकूणच, कथा संक्षिप्त असूनही वातावरण, संकेत आणि अचानक उलगडणाऱ्या भयामुळे प्रभावी ठरते. साध्या प्रवासकथेतून भयकथेचा आविष्कार घडवण्याची शैली ही या कथनाची विशेष ताकद आहे. सारांश: उत्साहाने सुरू झालेली पाच मैत्रिणींची राजस्थान सहल शापित किल्ल्यात प्रवेश करताच भयावह आणि अनाकलनीय शेवटाकडे वळते.
हर्षद खंदारे (निर्माते-मुख्य संपादक, मराठीमाती डॉट कॉम)
अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

जागतिक महिला दिन (८ मार्च)
जागतिक महिला दिन (८ मार्च)
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची