Loading ...

मोगऱ्याचं रोपटं - मराठी कविता (स्मिता त्रिभुवन)

मराठीमाती डॉट कॉम परिवाराच्या नोंदणीकृत सभासद कवयित्री ‘स्मिता त्रिभुवन’ यांची ‘मोगऱ्याचं रोपटं’ ही मराठी कविता.

मोगऱ्याचं रोपटं - मराठी कविता (स्मिता त्रिभुवन)

मोगऱ्याच्या रोपट्याच्या प्रतीकातून संघर्षातही शांत, सुगंधी आणि मुळांशी निष्ठावान राहण्याचा जीवनधडा देणारी कविता...

मोगऱ्याचं रोपटं

स्मिता त्रिभुवन (आर. जे. स्मिता, नाशिक, महाराष्ट्र)

प्रस्तावना
मोगऱ्याचं रोपटं प्रतिकूलतेतही पाळेमुळे घट्ट रोवत वाढत राहतं. वर दिसणाऱ्या सौंदर्यापेक्षा खालील मुळांची धडपड अधिक महत्त्वाची असते. वादळात ते वाकतं, पण तुटत नाही आणि पुन्हा सुगंध पसरवतं. मानवानेही मुळांशी निष्ठा ठेवून शांततेतून उत्तर द्यावं, हा संदेश कविता देते.

मोगऱ्याचं एक छोटंसं रोपटं पहिल्यांदा जमिनीत रुजतं तेव्हा त्याला ठाऊक नसतं उन्हं किती कडक असतील, पावसाळे किती ओले असतील, आणि वादळं किती रौद्र असतील. पण तरीही ते आपली पाळेमुळे घट्ट रोवत राहतं. हळूहळू… शांतपणे… मातीशी आपली नाळ जोडत राहतं. वरती असतात हिरवीगार पानं, शुभ्र, नाजूक फुलं, आणि मंद दरवळणारा सुगंध… पण खाली, खोलवर चाललेली असते मुळांची धडपड — त्याला अढळ करायची! वादळ येतं… फांद्या हलतात, पानं थरथरतात, कधी एखादं फूल गळूनही पडतं. क्षणभर वाटतं — सगळं कोसळेल कदाचित. ते मोगऱ्याचं रोपटं मात्र वाकतं… पण तुटत नाही. वादळ ओसरलं की त्याच फुलांचा सुगंध पुन्हा दूरवर दरवळू लागतो, जगाला न बोलता सांगत — “माझं उत्तर आरडाओरडीत नाही, माझं उत्तर आहे गंधात. माझी ताकद आवाजात नाही, माझी ताकद आहे मातीशी असलेल्या एकनिष्ठतेत.” आपल्यालाही मोगऱ्यासारखं जगता येईल का? वादळातही गंध पसरवता येईल का? मुळांना विसरू न देता आकाशाकडे पाहता येईल का? सापडेल का आपल्याला ते बळ — वादळाला उत्तर देण्याचं, आणि गंधाने जग जिंकण्याचं?

संपादकीय विश्लेषण
कवितेत मोगऱ्याचं रोपटं हे मानवी जीवनाचं प्रभावी रूपक आहे. वरच्या हिरव्या पानांमध्ये आणि शुभ्र फुलांमध्ये दिसणारं सौंदर्य हे बाह्य यशाचं प्रतीक आहे, तर खोलवर चाललेली मुळांची धडपड ही अंतर्गत जिद्द, मूल्यनिष्ठा आणि संयम दर्शवते. वादळाच्या प्रसंगातून संकटांची तीव्रता दाखवली आहे; परंतु रोपटं वाकतं पण तुटत नाही, हा संदेश लवचिकतेचा आणि मानसिक ताकदीचा आहे. कवितेची शैली साधी, प्रतीकात्मक आणि चिंतनशील आहे. शेवटच्या प्रश्नांमधून कवयित्री वाचकाला आत्मपरीक्षणाकडे वळवते आणि जीवनातील खऱ्या सामर्थ्याचा स्रोत मातीशी असलेल्या नात्यात — म्हणजेच आपल्या मूळ मूल्यांशी असलेल्या निष्ठेत — शोधण्यास प्रवृत्त करते.
— हर्षद खंदारे (निर्माते-मुख्य संपादक, मराठीमाती डॉट कॉम)
अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची