Loading ...
/* Dont copy */

बुद्धिबळ एक रंजक खेळ - मराठी कविता (कपिल गऊल)

बुद्धिबळ एक रंजक खेळ (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी कपिल गऊल यांची बुद्धिबळ एक रंजक खेळ ही मराठी कविता.

बुद्धिबळ एक रंजक खेळ - मराठी कविता (कपिल गऊल)

शिस्त, रणनीती, सहकार्य आणि जीवनातील संघर्ष–प्रगतीचा संदेश सोप्या व गेय शैलीत मांडणारी बुद्धिबळ एक रंजक खेळ ही कविता...

बुद्धिबळ एक रंजक खेळ

कपिल गऊल (संगमनेर, महाराष्ट्र)

ही कविता बुद्धिबळ या बौद्धिक खेळाची माहितीपर, प्रबोधनात्मक आणि गेय मांडणी करते. कवीने बुद्धिबळाला केवळ खेळ म्हणून न मांडता, नियम, डावपेच, शिस्त आणि रणनीतीचे प्रतीक म्हणून उभे केले आहे. कवितेची सुरुवात खेळाच्या रचनेपासून होते—६४ खाण्यांचा पट, दोन रंगांचे मोहरे—यातून समता व स्पर्धा अधोरेखित होते. राजा, वजीर, हत्ती, उंट, घोडे आणि प्यादे यांच्या चाली स्पष्ट करताना कवी प्रत्येक घटकाचे वेगळेपण आणि महत्त्व सोप्या भाषेत समजावतो. विशेषतः प्याद्याच्या पदोन्नतीचा उल्लेख जीवनातील संघर्षातून प्रगती या अर्थाला स्पर्श करतो. “आपले मोहरे आपणच मारत नाही” हा नियम केवळ खेळापुरता न राहता, समाजातील परस्पर सहकार्य, नातेसंबंध आणि नैतिकतेचे मूल्य सुचवतो. राजा वाचवण्यासाठी एकमेकांना संरक्षण देणे, क्यासलसारखे डाव—हे सगळे सामूहिक जबाबदारी आणि दूरदृष्टीचे प्रतीक ठरतात. शेवटी कविता वाचकाला प्रत्यक्ष खेळाकडे वळवते—शिकण्याची प्रेरणा देते आणि स्पर्धात्मक आत्मविश्वास जागवते. त्यामुळे ही कविता ज्ञान, खेळ आणि जीवनदर्शन यांचा सुंदर संगम साधते.

सांगतो बुद्धिबळ खेळाची गंमत तयार करून गाणे असतात पटावर ६४ खाणे, असतो खेळाचा उद्देश प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह देणे. महत्त्वाचा नियम — मोहरे आपलेच आपणास मारत नाही. असतात मोहरे रंगाने एकाचे पांढरे तर एकाचे काळे, मुख्य मोहरे असतात राजा, वजीर, हत्ती, उंट आणि घोडे. त्यांच्या समोरच्या रांगेत मांडले जातात प्यादे आठ, तिरपे चालून मारतात शत्रूला पडल्यास गाठ. प्याद्याची चाल असते सरळ एक खाणे, अपवाद म्हणून सुरुवातीला दोन खाण्यांची चाल असणे. काम असते त्याचे योग्य वेळी समर्पण देणे, समोरच्या खाण्यात पोहोचताच होते त्यांची पदोन्नती शेवटी. हत्तीची चाल असते उभी आणि आडवी, उंटाची चाल मात्र ठरलेली तिरपी. घोडा एक-दोन-अडीच चालतो, वजीर पटावर हत्ती-उंटाप्रमाणे लढतो. राजाची चाल असते सर्व दिशांनी एक खाणे, ज्याच्या राजाला शह बसतो तो डाव हरतो मानणे. मोहरे देतात संरक्षण आपले एकमेकांना, हत्तीची कॅसल करून राजा वाचवता येतो सहजपणे. खेळून पहा बुद्धिबळ जर आपल्याला येत नसेल, शिकून बुद्धिबळ तुम्हीही एखाद्या स्पर्धेत भाग घ्याल.

कपिल गऊल यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची