Loading ...
/* Dont copy */

भुताटकी – भाग १ (भयकथा) इंद्रजित नाझरे

भुताटकी – भाग १ (भयकथा) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक इंद्रजित नाझरे यांची भुताटकी – भाग १ ही मराठी भयकथा.

भुताटकी – भाग १ (भयकथा) इंद्रजित नाझरे

प्रेयसीसोबत फिरायला निघालेल्या तरुणाच्या आयुष्यात एका चेटकीणीच्या गूढ भेटीमुळे काळाच्या सीमारेषा ओलांडणारा भयावह अनुभव मांडणारी भुताटकी ही भयकथा...

भुताटकी – भाग १

इंद्रजित नाझरे (इचलकरंजी, महाराष्ट्र)


भुताटकी – भाग १ ही कथा प्रेम, विश्वास आणि काळाच्या सीमांपलीकडील भय यांचा संगम आहे. आपल्या प्रेयसीसोबत आनंदी सहलीला निघालेला विष्णू अचानक एका अशक्य, अलौकिक घटनेत अडकतो. वास्तव आणि भ्रम यांच्या सीमारेषा पुसट होत जातात आणि प्रेमाची आठवण भयाच्या गूढ सावलीत हरवून जाते. भुताटकी – भाग १ ही भयकथा वाचकाला हळूहळू भयाच्या गर्तेत ओढून नेते.

आज पहिल्यांदाच मी आणि मधुरा फिरायला बाहेर पडलो होतो. अर्थात, तिला प्रपोज केल्यानंतरची ही आमची पहिलीच भेट. मधुराने फार वाट पाहायला लावली नव्हती—अवघ्या दोन दिवसांत तिने होकार दिला होता.

मधुरा वायचळ आणि मी, विष्णू कुमठेकर—किशोरवयीन प्रेमात आकंठ बुडालेले. एकमेकांना समजून घेणारे, एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे. आज आम्ही दोघेही फिरायला निघालो होतो.

मधुरा छान मेकअप करून आली होती. ती आज विलक्षण सुंदर दिसत होती. मीसुद्धा टू-पीस कोटमध्ये काहीसा आकर्षक वाटत होतो, असं मला वाटत होतं.

आमची गाडी एका रम्य ठिकाणी पोहोचली. तेथे स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि पुढील प्रवासासाठी आम्ही निघालो. लवकरच आमचा साखरपुडा ठरलेला होता. घरचेही खूप आनंदी होते—कारण आमचं शिक्षण, करिअर आणि स्वप्नं सगळी एकसारखीच होती.

गाडी चालू होती. आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या.

“काय रे, आजचा माझा लूक कसा वाटतोय?” मधुराने विचारलं.

मी साईड मिररमधून तिच्याकडे पाहिलं. ते गुलाबी ओठ... ते हसरे डोळे... “खूपच सुंदर दिसतेस,” मी म्हणालो. “माहिती आहे का, मी तुलाच का प्रपोज केलं?”

“का?” तिने कुतूहलाने विचारलं.

मी गाडी थांबवली. सभोवताल निर्मनुष्य होता. सायंकाळचा अंधुक प्रकाश हळूहळू गडद होत चालला होता.

आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो.

“ए, कुठे हरवलास?” मधुराने चुटकी वाजवत विचारलं.

“तुझ्या त्या अथांग, पाणवलेल्या डोळ्यांत…” मी उत्तर दिलं.

ती स्मितहास्य करत म्हणाली, “हो का?” तिच्या गालावर एक नाजूक खळी पडली.

मी थोडा जवळ गेलो. तिचे केस कानामागे सारले. ती लाजून दुसरीकडे पाहू लागली.

मी तिची मान हळूच माझ्याकडे वळवली.

आणि—

क्षणात सगळं बदललं.

ज्या डोळ्यांत प्रेम होतं, तिथे आता असुरी, राक्षसी डोळे चमकत होते.

तो सुंदर चेहरा क्षणात भयानक चेटकीणीत बदलला. तिने तोंड इतकं मोठं उघडलं, जणू मला गिळंकृत करणारच होती.

तेवढ्यात मागून एक आवाज घुमला— “होशियार चिंगी...!”

क्षणात ती चेटकीण गायब झाली.

माझ्या डोक्यात प्रचंड गरगर झाली. मी स्टेरिंगवरच डोकं टेकवलं.

आकाशात अचानक वटवाघळांचा थवा उडू लागला. कल्लोळ करत त्यांनी सारा अवकाश झाकून टाकला.

काही क्षणांनी काही खेडूत लोक माझ्या गाडीपाशी आले. त्यांनी पाणी तोंडावर शिंपडलं.

मी दचकून जागा झालो.

“कोण आहात तुम्ही? हे काय चाललंय?” मी घाबरून विचारलं.

“ही गाडी तुमचीच आहे का?” एक खेडूत संशयाने विचारू लागला.

“हो… पण माझी प्रेयसी मधुरा कुठे आहे? ती बाई.. ती कोण होती?” मी प्रश्नांचा भडिमार केला.

ते एकमेकांकडे पाहू लागले.

“हे आमचं गाव आहे. पण तुम्ही कुठून आलात? आणि प्रेयसी म्हणजे कोण?” त्यांनी विचारलं.

माझ्या डोक्यात काहीच बसत नव्हतं. मी आजूबाजूला पाहिलं.

जिथे डांबरी रस्ता असायला हवा होता, तिथे घनदाट झाडी होती.

मोबाईल काढून मधुराला, घरच्यांना फोन लावला— पण कुठलाच संपर्क झाला नाही.

मी मागे वळून पाहिलं. जिथे आम्ही खाद्यपदार्थ खाल्ले होते, ती जागा आता खूप दूर… आणि ओळखू न येण्यासारखी होती.

मी घडलेली सगळी घटना गावकऱ्यांना सांगितली.

ते गंभीर झाले.

“अहो, तुम्ही सांगत असलेलं गाव आम्ही कधी ऐकलंच नाही. आणि जिथं तुम्ही पाणीपुरी खाल्ली, तिथं तर मोठी स्मशानभूमी आहे.”

माझं काळीज धडधडू लागलं.

“आणि तुमच्यासोबत जी बाई होती... ती तुमची प्रेयसी नव्हती.”

“ती म्हणजे— या स्मशानात जिवंत जाळून मारलेली चिंगी नावाची चेटकीण होती.”

माझे डोळे पांढरे पडले. तोल जाऊन मी खाली कोसळलो.

गावकऱ्यांनी मला तात्काळ दवाखान्यात नेलं.

मी सन २०२५ मध्ये प्रेयसीसोबत फिरायला निघालो होतो... पण त्या एका भयावह घटनेनं मला थेट ५० वर्षे मागे—सन १९७५ मध्ये नेलं.

आणि मधुरा... ती कायमची गायब झाली.

प्रेयसीसोबत आनंदी सहलीला निघालेला विष्णू एका चेटकीणीच्या भयानक भ्रमात अडकून काळाच्या पन्नास वर्षे मागे फेकला जातो.

भुताटकी – भाग १ क्रमशः

इंद्रजित नाझरे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची