Loading ...

माझं वावर - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

माझं वावर (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी डॉ.बालाजी राजूरकर यांची माझं वावर ही मराठी कविता.

माझं वावर - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

शेतकऱ्याच्या कष्ट, संकटे आणि अन्यायकारक वास्तवाचे हृदयस्पर्शी चित्रण करणारी माझं वावर ही कविता...

माझं वावर

डॉ.बालाजी राजूरकर (हिंगणघाट, महाराष्ट्र)

माझं वावर ही कविता शेतकऱ्याच्या आयुष्याचा संघर्ष मांडते. पिकाची लागवड, रोगराई, जनावरांचा त्रास, हवामानाचे संकट आणि शेवटी बाजारातील अन्यायकारक दर या सगळ्या यातना त्याच्या वाट्याला येतात. आयुष्यभर कष्ट करूनही कर्जबाजारीपणाचं ओझं वाढतं आणि शेतकरी जगण्याचा प्रश्न विचारतो.

काय सांगू तुले वावरात माझं पिक उभं डुलतं हरकून जाये मन वाटतं निसर्गाला आभार मानतं जंगली जनावरं घालती धुमाकूळ माझ्या वावरात छाती माय धडधड करी तवा मन गेलं चिंतेत राखण धरली माऱ्यावर वाचवाया रातीला पिक जीव मुठीत धरूनिया निघालो वाचवायला ठीक पिक आलं बरं जोमात तवा रोग पडला त्याच्यावर फवारणी मारून किडनाशक नायनाट केला त्याच्यावर आलं पिक सावंगणीला आभाळ गडगड करी रे हातातलं पिक वाचवताना डोळ्यांतून पाणी झरी रे कसबस काढून पिक विकाया बाजारात नेलं व्यापारी नाचला ढिगावर मातीमोल भावान गेलं वाटे कस फेडावं कर्ज आणि उधारी सारी सांग रे काय पाप केलं जन्मा येऊन शेतकरी

डॉ.बालाजी राजूरकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची