Loading ...
/* Dont copy */

सेवा पंधरवडा २०२५ - छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

सेवा पंधरवडा २०२५ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान – शेतकरी, शेतरस्ते, ग्रामविकास आणि घरकुल वाटपासाठी ऐतिहासिक उपक्रम.

सेवा पंधरवडा २०२५ - छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

सेवा पंधरवडा २०२५ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान – शेतकरी, शेतरस्ते, ग्रामविकास आणि घरकुल वाटपासाठी सुवर्णसंधी...

सेवा पंधरवडा २०२५ - छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

प्रा. डॉ. विलास डोईफोडे (सावनेर, नागपूर, महाराष्ट्र)

राज्यात महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत ‘सेवा पंधरवडा २०२५’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी, म्हणजे १७ सप्टेंबर पासून सुरू होऊन महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत, म्हणजेच २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालणार आहे.

या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील आणि सामान्य जनतेच्या समस्या प्रत्यक्ष सोडविणे, महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचा अनुभव नागरिकांना देणे आणि जनतेचा विश्वास दृढ करणे.

तीन टप्प्यांत राबविण्यात येणारा उपक्रम


पहिला टप्पा (१७ ते २२ सप्टेंबर)

शेतकरी आणि शेतीसाठी हा सेवा पंधरवडा २०२५ अत्यंत महत्त्वाचा.

  • पांदन/शेतरस्त्यांना क्रमांक देणे
  • शासनदरबारी नोंदी करणे
  • मोजणी व सीमांकन करणे
  • पांदन रस्त्यांशी संबंधित समस्या व वाद सोडविणे

अनेक पांदन रस्ते नोंदीत नाहीत, तसेच ते बारमाही वापरासाठी योग्य नाहीत. या उपक्रमामुळे अनेक दशकांपासून रखडलेली समस्या मार्गी लागण्याची शक्यता आहे.

दुसरा टप्पा (२३ ते २७ सप्टेंबर)

सर्वांसाठी घरकुल आणि पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप.

तिसरा टप्पा (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर)

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक परिस्थितीप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रम.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी


या उपक्रमामुळे अनेक पिढ्यांपासून रखडलेल्या शेतरस्त्यांच्या समस्यांना नवी दिशा मिळू शकते. शेतकरी, ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणा यांनी प्रामाणिकपणे सहकार्य केल्यास शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने “अच्छे दिन” येऊ शकतात.

अपेक्षा आणि वास्तव


  • हा उपक्रम कागदावरच न राहता प्रत्यक्ष अंमलात आला पाहिजे.
  • नुसते गाजावाजा व फोटोसेशन न होता, परिणामकारक कार्यवाही झाली पाहिजे.
  • स्थानिक प्रशासन, शासकीय यंत्रणा आणि जनता – सर्वांनी सतर्क व जबाबदार राहिले पाहिजे.

निष्कर्ष


सेवा पंधरवडा २०२५ हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत राबविला जाणारा उपक्रम खर्‍या अर्थाने गोरगरीब, वंचित आणि शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरू शकतो. यशस्वी अंमलबजावणी झाली, तर भविष्यात शासनाचे इतर विभागही अशा प्रकारचे अभियान राबवतील आणि समाजहिताचे नवे दालन खुले करतील.

प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची