Loading ...
/* Dont copy */

काजळमाया - ३०० वर्षांनंतर ती परत येतेय

३०० वर्षांनंतर ती परत येतेय - स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी गूढ मालिका काजळमाया (Kajalmaya Marathi Serial).

काजळमाया - ३०० वर्षांनंतर ती परत येतेय

गूढ गोष्ट म्हणजेच काजळमाया...

काजळमाया - ३०० वर्षांनंतर ती परत येतेय

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

दर्जेदार मालिकांच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनी गेली ५ वर्षे सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नवनवे विषय, गुंतवून ठेवणारं कथानक आणि आपल्या कुटुंबाचाच भाग वाटतील अशी मालिकेतली पात्र हे स्टार प्रवाह वाहिनीचं वेगळेपण. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर लवकरच गूढ मालिका पाहायला मिळणार आहे. मालिकेचं नाव आहे काजळमाया. चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची ही गोष्ट. तिला चिरतारुण्याचं वरदान आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. स्वतःचं अस्तित्व आणि सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा यापलिकडे कुठलाही विचार तिच्या मनात कधीच नसतो. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुषकडून आव्हान मिळतं तेव्हा सुरुवात होते एका अद्भूत गोष्टीला. ही गूढ गोष्ट म्हणजेच काजळमाया. सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर आरुष वालावलकर हे पात्र साकारणार आहे.

काजळमाया मालिकेतल्या आरुष या पात्राविषयी सांगताना अक्षय म्हणाला, ‘मुख्य अभिनेता म्हणून स्टार प्रवाहसोबतची ही माझी पहिली मालिका. कम्फर्ट झोनच्या बाहेरचं हे पात्र आहे. आरुष कवी मनाचा आहे. अत्यंत साधा, सरळ, कुटुंबावर प्रचंड प्रेम करणारा. त्याचा चांगुलपणा ही त्याची ओळख आहे. आरुष मराठी विषयाचा प्रोफेसर आहे. त्याचं व्यक्तिमत्व सामान्य असलं तरी मराठी विषयातलं त्याचं ज्ञान आणि विशेषकरुन कविता वाचनातली त्याची हातोटी कमाल आहे. पहिल्यांदा गूढ मालिकेत अश्या पद्धतीचं पात्र साकारत असल्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे अशी भावना अक्षय केळकरने व्यक्त केली.’

स्टार प्रवाहच्या या नव्या प्रयोगाबद्दल सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘गूढ, उत्कंठावर्धक असे विषय कायम रसिकांच्या स्मरणात रहातात. प्रेक्षकांनी अश्या विषयांना आधी पण पसंती दिली आहे. काजळमाया हा स्टार प्रवाहसाठी एक नवा विषय आहे जो इतर मालिकांप्रमाणेच आकर्षणाचा विषय ठरेल. नवा विषय, नवी पात्रं आणि कलाकारांच्या साथीने काजळमाया खूप लोकप्रिय होईल अशी खात्री वाटतेय. तेव्हा पाहायला विसरु नका नवी गूढ मालिका काजळमाया लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.’

मराठी टिव्ही यासंबंधी इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची