Loading ...

निसर्ग : महान अभियंता - मराठी कविता (कपिल गऊल)

निसर्ग : महान अभियंता (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी कपिल गऊल यांची निसर्ग : महान अभियंता ही मराठी कविता.

निसर्ग : महान अभियंता - मराठी कविता (कपिल गऊल)

निसर्ग : महान अभियंता ही कविता निसर्गाला सर्वांत श्रेष्ठ अभियंता मानून, मानवी अभियंत्यांना त्याच्याकडून प्रेरणा घेण्याचा संदेश देते....

निसर्ग : महान अभियंता

कपिल गऊल (संगमनेर, महाराष्ट्र)

ही कविता अभियंता दिनाच्या निमित्ताने निसर्गाचा गौरव करते. माणसाने केलेली प्रत्येक निर्मिती — घर, पूल, यंत्रणा — यामागे मूळ प्रेरणा निसर्गातूनच मिळाल्याचे कवी अधोरेखित करतात. पंचमहाभूतांपासून ते सूक्ष्मजीवांपर्यंत प्रत्येक घटकाचे महत्त्व दाखवून, त्यांच्याविना मानवी अस्तित्व अपूर्ण ठरेल, असे सांगितले आहे.

कवितेत कोळ्याचे जाळे, पक्ष्यांचे घरटे, कचरा विघटन, शेतीतील सूक्ष्मजीव यांसारख्या उदाहरणांतून निसर्गाची अभियांत्रिकी किती कुशल आणि अद्वितीय आहे हे स्पष्ट होते. अभियंता जसे आराखडा आखतो तसे निसर्गही स्वतःचे संतुलन राखतो, हा संदेश ठळक आहे.

एकूणच, कविता सांगते की निसर्गच खरा ‘महान अभियंता’ आहे आणि मानवी अभियंते त्याच्याकडून शिकून, संसाधनांचा संयमी वापर करून, जीवन टिकवून ठेवावेत.

निसर्गाचे निर्माण झाले जल, अग्नी, वायू, आकाश अन् पृथ्वी वापरून घटक जसे दगड, विट, स्टील, वाळू, सिमेंट अन् खडी घर निर्मितीचे कारक त्यावर जिवंत श्रमिक वर्ग, जो आहे म्हणे पृथ्वीचा तारक संदेश आहे सर्वाना संयमित वापरा संसाधने, होऊ देवू नका मारक जसे इंजिनियर करतो नियोजन आरेखन आणि प्रबंधन तसे निसर्ग पहातो स्वतःच स्वतःचे व्यवस्थापण माणवाने निसर्गातूनच साऱ्या गोष्टी शिकल्या आहे अन्न वस्त्र निवारा शिक्षण गरजांचा स्त्रोत निसर्गच आहे कोळ्यांचे जाळे स्टील पेक्षाही (तन्यता १-२ Gpa) भक्कम असते पक्षांना घरटे बांधायला कोणी बरे शिकवते? सूक्ष्मजीवविना कचरा विघटन कसे झाले असते? शेतीतही त्यांची भूमिका मुख्य असते. त्यांच्या शिवाय कदाचित मानव जातीचे अस्तित्वच नसते! त्यांच्या शिवाय मानव यंत्र अभियांत्रिकी सर्वकाही व्यर्थ निसर्गच आहे सर्व समावेशक अन ‘महान अभियंता’ हाच निघतो अर्थ सदर कविता अभियंता दिनानिम्मित होत सार्थ

कपिल गऊल यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची