Loading ...
/* Dont copy */

शब्द, रंग, सुरांच्या झुल्यावर – श्रावणगीतांची सुरेल मैफल

एस.एन.डी.टी. महाविद्यालय, पुणे येथे शब्द, रंग, सुरांच्या झुल्यावर श्रावणगीत मैफिलीने साहित्य, संगीत व चित्रकलेचा त्रिवेणी संगम अनुभवला.

शब्द, रंग, सुरांच्या झुल्यावर – श्रावणगीतांची सुरेल मैफल

एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी साहित्य, संगीत आणि चित्रकलेचा त्रिवेणी संगम...

शब्द, रंग, सुरांच्या झुल्यावर – श्रावणगीतांची सुरेल मैफल

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, पुणे येथे प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांच्या मार्गदर्शनाखाली “शब्द, रंग, सुरांच्या झुल्यावर” या श्रावणगीतांच्या अनोख्या मैफिलीचे आयोजन उत्साहात पार पडले.

या विशेष कार्यक्रमात मराठी, हिंदी आणि इंग्रजी विभागासह संगीत विभागातील प्राध्यापकांनी स्वतः रचलेल्या तसेच निवडक कवितांची व गीतांची सादरीकरणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि काव्यवाचन डॉ. प्रिया जामकर यांनी प्रभावीपणे केले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. प्रसाद जोगळेकर (USA) यांच्या सुरेल सतारवादनाने आणि ऐश्वर्या कडेकर यांच्या मधुर आलापाने झाली. त्यानंतर डॉ. प्रिया जामकर यांच्या कवितेने रसिकांचे मन मोहून टाकले. प्रा. मीनाक्षी बसवंत, ऐश्वर्या कडेकर आणि डॉ. अंजली कदम यांनी सादर केलेल्या श्रावणगीतांना महेश केंगार (तबला) आणि सुधीर टेकाडे (संवादिनी) यांची साथ लाभली.

साहित्यिक रंगत वाढवण्यासाठी डॉ. प्रिया जामकर, डॉ. मृणालिनी घाटगे आणि डॉ. शिवदत्त वावळकर यांनी निवडक कवितावाचन केले. तर चित्रकला विभागातील दोन विद्यार्थिनींनी सादर झालेल्या गीतांच्या आशयाशी सुसंगत अशी थेट चित्रे रंगवून कार्यक्रमात दृश्यात्मक सौंदर्याची भर घातली.

या सांगीतिक व साहित्यिक सोहळ्याला महाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक, कर्मचारी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पावसाळ्याच्या सरींसारखे श्रावणगीतांचे सूर वातावरणात दरवळले आणि या मैफिलीने प्रेक्षकांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला.

यासंबंधी इतर बातम्या वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची